मुंबई - विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर शिवसेनेचा किंग मेकर होणार आहे. त्यामुळे शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेचा पॅटर्न लावण्याचा प्रयत्न सुरू केला. या पॅटर्ननुसार अपक्ष आणि बंडखोरांचा पाठिंबा घेऊन शिवसेना संख्याबळ वाढवत असून भाजपवर एक प्रकारे दबाव तंत्र तयार करत आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 56 उमेदवार निवडुन आले आहेत. त्यानंतर आता इतर 4 अपक्ष आमदारांनीही शिवसेनेला समर्थन जाहीर केल्यामुळे शिवसेना समर्थक आमदारांची संख्या आता 60 वर पोहोचली आहे.
हेही वाचा - 'जिंकलो नाही, पण संपलो ही नाही',उदयनराजेंची भावनिक पोस्ट
विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या आहेत. तर, शिवसेनेला 56 जागांसह विदर्भातील 2 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयसवाल आणि नरेंद्र बोंडेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेला पाठींबा दिला आहे. 22 अपक्षांपैकी 2 आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला असून शिवसेना संख्याबळ वाढवण्यासाठी इतर अपक्षांसोबत मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच यातील अजून 5 ते6 आमदार शिवसेनेकडे आणण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यावरूनच शिवसेनेचा दबाव भाजपवर जास्त असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - सिडकोनिर्मित्त जुन्या व मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीतील रहिवाशांची फरफट