मुंबई Israel Flag : इस्रायलच्या ध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस ठाण्यात (JJ Marg Police Station) भारतीय दंड संविधान कलम 153 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चार आरोपींना अटक करण्यात (Mumbai Crime News) आली आहे. मोईन हसन मन्सुरी, आतिफ सिद्दिक मन्सुरी, दानिश अफजल मंसूरी आणि अब्बास इलिया शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. या चारही आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर आरोपींचे वकील रशीद इकबाल त्यांनी प्रत्येकी तीन हजारच्या जामीनावर त्यांची सुटका करून घेतली आहे.
पोलिसांनी चौघांनाही केली अटक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार आरोपींनी भेंडी बाजार जंक्शनवर इस्रायलचे स्टिकर्स (Israel Stickers) चिकटवले होते. तसेच जाणूनबुजून राष्ट्रध्वजाचा अनादर केला आणि नंतर ध्वज जाळला. त्याचबरोबर त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. या प्रकरणाचं गांभीर्य पाहून पोलिसांनी चौघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. जे जे मार्ग पोलिसांनी (JJ Marg Police) त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम १५३अ, १४१, १४३, १४६, १४९ अन्वये गुन्हा दाखल केला.
ध्वज जाळलाचा केला व्हिडिओ व्हायरल : मुंबईतील भेंडी बाजार परिसरात काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रस्त्यावर इस्रायली ध्वज जाळला होता. त्याचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन तसेच इस्राईल नागरिकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी जे जे मार्ग पोलिसांनी तातडीने दखल घेतली. सहायक पोलीस निरीक्षक पवार यांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला. तसेच अटक केलेल्या आरोपींना अशा प्रकारे दुसऱ्या राष्ट्राच्या भावना दुखावणारे कृत्य न करण्याची ताकीद दिली आहे.
हेही वाचा -