ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाला एक वर्ष पूर्ण; वर्षभरात 365 आरोग्य व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा मृत्यू - मुंबई आरोग्य कर्मचारी कोरोना मृत्यू न्यूज

देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. पुन्हा ठिकठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना योद्ध्यांना पुन्हा संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Mar 11, 2021, 11:55 AM IST

मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने मागील वर्षी आजच्याच दिवशी (11 मार्च) मुंबईत शिरकाव केला होता. गेल्या वर्षभरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी प्रयत्न करत आहेत. मुंबईमधील कोरोनाचा प्रसार रोखताना गेल्या वर्षभरात आरोग्य, पालिका, बेस्ट आणि मुंबई पोलिस विभागातील तब्बल 365 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

महानगरपालिकेच्या 197 कर्मचाऱ्यांचा मृत्यू -

मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत 3 लाख 37 हजार 123 नागरिकांना कोरोनाची लागण झाली. मृतांचा आकडा 11 हजार 511वर पोहचला आहे तर, 3 लाख 13 हजार 346 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आल्यापासून पालिकेने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज केली. रुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार सुरू केले. मुंबईत स्वच्छता ठेवण्यासाठी, लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावर राहणाऱ्या, हातावर पोट असलेल्या कामगारांना तसेच कंटेंन्मेंट झोनमधील नागरिकांना जेवणाची सोय म्हणून अन्न वाटप, पाणी वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर राज्याबाहेर आपल्या गावी जाणाऱ्या कामगारांना जेवण आणि पाण्याची सोय करण्यात आली. यासाठी पालिकेचे कर्मचारी काम करत होते. या वर्षभरात पालिकेच्या 5 हजाराहून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 197 कर्मचारी अधिकाऱ्यांचा कोरोनाचा मुकाबला करताना मृत्यू झाला.

बेस्टच्या 76 कर्मचाऱ्यांचा मृत्यू -

मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर लोकल ट्रेन बंद करण्यात आली. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणी नेऊन पोहचवण्याचे काम बेस्टवर सोपवण्यात आले. या कामादरम्यान बेस्टच्या 2 हजार 958 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 2 हजार 834 कर्मचारी कोरोनामधून बरे झाले तर, 76 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या बेस्टमधील 21 कर्मचारी उपचार घेत असून एक कर्मचारी ऑक्सिजनवर आहे.

92 पोलिसांचा मृत्यू -

मुंबईत कोरोनाच्या प्रसारादरम्यान कंटेंन्मेट झोन तसेच शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम मुंबई पोलीस दलाने केले. यादरम्यान एक हजाराहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 92 पोलिसांचा मृत्यू झाला.

मुंबईतील एकूण रुग्णसंख्या आणि मृत्यू -

मुंबईत काल(10 मार्च) 1 हजार 539 रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 37 हजार 123 वर पोहचला आहे. 5 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 511 वर पोहचला. बुधवारी 888 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 13 हजार 346 वर पोहचली. मुंबईत सध्या 11 हजार 379 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 215 दिवस इतका आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 34 लाख 75 हजार 744 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

4 लाख 76 हजारजणांचे लसीकरण -

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवरीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 753 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 1 लाख 75 हजार 322 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 17 हजार 357 फ्रंटलाईन वर्कर, 1 लाख 65 हजार 034 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वायमधील गंभीर आजार असलेल्या 19 हजार 40 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

कोरोना योद्ध्यांचे मृत्यू -

मुंबई महानगरपालिका - 197
मुंबई पोलीस दल - 92
बेस्ट - 76
एकूण - 365

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.