ETV Bharat / state

Measles Patients : मुंबईत गोवर रूग्णसंख्येत वाढ, एक मृत्यू तर ३२०८ संशयित रुग्ण

( Measles Patients in Mumbai ) मुंबईत वाढत्या गोवरच्या रूग्णसंख्येत आतापर्यंत एकूण २०८ रुग्णांची तर ३२०८ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. गोवंडी येथील एका १ वर्ष ३ महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १० झाला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 21, 2022, 10:46 PM IST

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची ( Measles Patients in Mumbai ) संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण २०८ रुग्णांची तर ३२०८ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. गोवंडी येथील एका १ वर्ष ३ महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १० झाला आहे. १० पैकी ९ मृत्यू मुंबईतील तर १ मृत्यू मुंबई बाहेरील आहे. २६ रुग्ण ऑक्सीजनवर १ रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

२६ रुग्ण ऑक्सिजनवर, १ व्हेंटिलेटवर - मुंबईत २८ लाख ६७ हजार ९५१ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ३२०८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे २०८ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी कस्तुरबा, गोवंडी शिवाजी नगर प्रसूती गृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राजावाडी, शताब्दी, सेव्हन हिल या रुग्णालयात १३५ बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी ९४ बेडवर रुग्ण असून ४१ बेड रिक्त आहेत. जनरल बेड ९२ असून ६७ बेडवर रुग्ण आहेत तर २५ बेड रिक्त आहेत. ऑक्सीजनचे ३४ बेड असून २६ बेडवर रुग्ण आहेत तर ८ बेड रिक्त आहेत. ९ व्हेंटिलेटवर असून त्यापैकी एकावर रुग्ण आहे तर ८ व्हेंटिलेटरवर रिक्त आहेत. ९ महिने ते ५ वर्षाच्या मुलांना गोवरची लस द्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १६ हजार ८७७ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत ९ तर बाहेरील १ मृत्यू - मुंबईत आतापर्यंत ९ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी एक मृत्यू मुंबईबाहेरील आहे. २१ नोव्हेंबरला आणखी एका गोवंडी येथील मुलीचा मृत्यू झाला आहे. १ वर्षे ३ महिन्याची ही मुलगी आहे. तिच्यावर ५ व्या महिन्यात हायड्रोसिफलसची शस्त्रक्रिया झाली होती. ३ नोव्हेंबर रोजी तीला ताप सर्दी खोकला झाला, ५ नोव्हेंबरला पुरळ आले. ६ नोव्हेंबरला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ११ नोव्हेंबरला हृदय काम करण्याचे बंद झाल्याने लहान मुलांच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. १३ नोव्हेंबर रोजी या मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. २१ नोव्हेंबर रोजी तीचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील मृतांची संख्या ९ झाली आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

लसीकरण आणि जनजागृतीवर भर - मुंबईत ० ते २ वयोगटातील पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले आहे. यात २० हजार मुलांचे लसीकरण राहिले आहे. काहींनी एकच डोस घेतला आहे. तर काहींनी लसिकरणच केलेले नाही. त्यामुळे अशा २० हजार मुलांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले जाणार असून या सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लस घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. गोवंडी, चेंबूर, भायखळा, कुर्ला, मालाड, धारावी, सांताक्रूझ, वडाळा या ८ विभागात गोवरचे रुग्ण सर्वाधिक आहेत. यामुळे या विभागात जनजागृती केली जात आहे. धर्म गुरू, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत लसीकरणबाबत जनजागृती केली जात आहे. गरज पडल्यास बेड आयसीयु आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढवली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.