ETV Bharat / state

Ranibaug Mumbai : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राणीबागेत विक्रम; ३२ हजार पर्यटकांनी दिली भेट - पर्यटक

राणीबाग म्हणजेच वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान (Veermata Jijabai Bhosale Park) आणि प्राणी संग्रहालयात 2017 मध्ये परदेशी हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढू लागली. नववर्षाच्या स्वागतासाठी पहिल्याच दिवशी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला तब्बल ३२ हजार ८२० पर्यटकांनी भेट (32 thousand tourists visit to Ranibaug) दिली.

Ranibaug Mumbai
रानिबागेत ३२ हजार पर्यटकांनी दिली भेट
author img

By

Published : Jan 1, 2023, 8:50 PM IST

रानिबागेत ३२ हजार पर्यटकांनी दिली भेट

मुंबई : बच्चे कंपनी आणि पर्यटकांची आवडती राणीबाग कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर पुन्हा बहरू लागली आहे. शाळांना सुट्टी पडल्याने पर्यटकांच्या झुंडी राणीबागेत येत आहेत. आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (Veermata Jijabai Bhosale Park) व प्राणिसंग्रहालयाला तब्बल ३२ हजार ८२० पर्यटकांनी भेट (32 thousand tourists visit to Ranibaug) दिली. या विक्रमी संख्येमुळे यापूर्वीचा एकाच दिवशी पर्यटक भेटीचा ६ नोव्हेंबर २०२२ रोजीचा विक्रम मागे टाकून या प्राणिसंग्रहालयाने आपल्या शिरपेचात आज नवीन तुरा खोवला आहे.

पर्यटकांची गर्दी वाढली : राणीबाग म्हणजेच वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात 2017 मध्ये परदेशी हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढू लागली. त्यानंतर 2020 मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने गेले दोन वर्षे राणीबाग काही काळाचा अपवाद वगळला तर बंदच होती. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर नोव्हेंबरपासून पुन्हा राणीबाग पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. याच दरम्यान राणीबागेत वाघ, तरस, कोल्हा, बिबट्या, अस्वल आदी प्राणी आणण्यात आले. यामुळे शाळांना सुट्टी पडल्यावर पुन्हा राणीबागेत पर्यटकांनी गर्दी केली आहे.

रेकॉर्ड ब्रेक पर्यटक : ६ नोव्हेंबर २०२२ रोजी एकाच दिवशी ३१ हजार ८४१ पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन विक्रमी संख्येची नोंद केली होती. त्या दिवशी सुमारे ११ लाख १२ हजार ९२५ रुपयांचे महसुली उत्पन्न महानगरपालिकेच्या तिजोरी जमा झाले होते. हा विक्रम आज (दिनांक १ जानेवारी २०२३) मोडीत निघाला आहे. आज एकाच दिवसात तब्बल ३२ हजार ८२० पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. त्यातून सुमारे १३ लाख ७८ हजार ७२५ रुपयांचे महसुली उत्पन्न प्राप्त झाले. यामध्ये ऑफलाईन पद्धतीने २७ हजार २६२ पर्यटकांनी भेट दिली. त्यातून ९ लाख ६० हजार ७२५ रुपये उत्पन्न मिळाले. तर ऑनलाईन नोंदणी करून ५ हजार ५५८ जणांनी भेट दिली. यातून ४ लाख १८ हजार रुपयांची तिजोरीत भर पडली.

गर्दीचे योग्य रीतीने नियंत्रण : विक्रमी संख्येने पर्यटक दाखल होत असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमून गर्दीचे योग्य रीतीने नियंत्रण करण्यात आले. तसेच पर्यटकांचे व्यवस्थापन करताना काळजी म्हणून दोनदा मुख्य प्रवेशद्वार तात्पुरते बंद करून नियोजन करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढून देखील अतिशय योग्य रीतीने सर्वांना पक्षी, प्राणी आणि उद्यान पाहता येईल, याची प्राणिसंग्रहालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली. सर्वांना सामावून घेणे शक्य नसल्याने मुख्य प्रवेशद्वार सायंकाळी ४.४५ वाजता बंद करण्यात आल्यानंतर नाईलाजाने काही पर्यटकांना माघारी जावे लागले, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.