मुंबई - मुंबई पोलीस खात्यातील तब्बल ३०० अधिकारी अंमलदारांची सुपर सेव्हर समूहात निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय जन आरोग्य प्रशिक्षण संशोधन संस्थेने कोरोना रुग्णांवर त्वरित उपचार होण्यासाठी हा समूह तयार केला आहे. ज्यामध्ये मुंबई पोलीस खात्यातील ३०० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांना बेड व इतर वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी अडचणी येतात. अशा वेळेस कोरोना रुग्णांना बेड, वैद्यकीय सुविधा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर कसा उपलब्ध होईल याचं प्रशिक्षण यामध्ये देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या सुपर सेव्हर समूहात पोलिसांचा समावेश असावा असं राष्ट्रीय जन आरोग्य प्रशिक्षण संशोधन संस्थेनं म्हटलं होतं. त्यानुसार मुंबई शहरासाठी मुंबई पोलीस खात्यातून ३०० अधिकारी अंमलदारांची निवड करण्याचं काम सुरू झालं आहे.
हेही वाचा - तारापूर औद्योगिक क्षेत्रात भीषण आग, तीन बंब घटनास्थळी दाखल
हेही वाचा - 'ब्रेक दि चेन' अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले