मुंबई - रेल्वे प्रशासनाने तामिळनाडूला जाणाऱ्या प्रवाशांना अर्धा तास आधी गावी जाण्यासाठी सूचना दिल्याने गोंधळ उडाला होता. याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.
त्यानंतर रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यात बैठक पार पाडली. या बैठकीत मुंबई महापालिका आयुक्त व मुंबई पोलीस आयुक्त यांनी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार धारावीतील मजुरांना गावी सोडण्यात येणार आहे.
धारावीत जवळपास 3 लाख मजूर राहत असून त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मजुरांना गावी पाठवणे आवश्यक होते. या मजुरांना गावी पाठवल्याने आरोग्य सेवेवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.
यापूर्वी धारावीतून उत्तरप्रदेश आणि बिहारचे मजूर रेल्वेने पाठविले आहेत. आता दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्या सोडण्यात याव्या, त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली असल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले.