ETV Bharat / state

गोवंडीत ड्रेनेज स्वच्छ करताना गुदमरुन तीन कामगारांचा मृत्यू - 3 died in manual scavenging in mumbai

एका खासगी इमारतीचे ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. दुपारी बाराच्या दरम्यान ही घटना समोर आली.

3 labour died in gowandi
गोवंडीत सेप्टीक टँकची स्वच्छता करत असताना तीन कामगारांचा मृत्यू
author img

By

Published : Dec 23, 2019, 5:13 PM IST

Updated : Dec 23, 2019, 10:39 PM IST

मुंबई - गोवंडी पूर्व येथे सेप्टीक टँकची स्वच्छता करत असताना तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका खासगी इमारतीचे ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. दुपारी 12 च्या दरम्यान ही घटना समोर आली.

गोवंडीत ड्रेनेज स्वच्छ करताना गुदमरुन तीन कामगारांचा मृत्यू

'मोरया' इमारतीच्या ड्रेनेजची स्वच्छता करण्यासाठी एक कामगार उतरला होता. गटारात ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने संबंधित कामगार चक्कर येऊन पडला. त्याला वाचवण्यासाठी आणखी दोघे उतरले. तेही चक्कर आल्याने गटारातच पडले. यानंतर त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, गोवंडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या तिघांना बाहेर काढून पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यामधील फक्त एकाच कामगाराची ओळख पटली असून देबनाथ डिसुजीत असे त्याचे नाव आहे. तर, दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. हे खासगी सफाई कामगार होते. सध्या गोवंडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Intro:Body:

Three labourers lost their lives while cleaning a septic tank in Govandi (East) area of Mumbai, earlier today.

Conclusion:
Last Updated : Dec 23, 2019, 10:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.