ETV Bharat / state

आज..आत्ता..बुधवार सायंकाळी 7 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या घडामोडी..

मोतीलाल व्होरा काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष बनणार? याविषयीची चर्चा सध्या सुरू आहे....तिवरे धरणाचे बांधकाम शिवसेनेच्या विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांचे असल्याचे समोर येत आहे...तिवरे धरण अवघ्या १९ वर्षातच फुटले कसे? वडेट्टीवारांचा राज्य सरकारला सवाल...वंचितने काँग्रेसला दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे...अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालयला जुगारप्रकरणी अटक

बातमी, सर्वांच्या आधी
author img

By

Published : Jul 3, 2019, 6:54 PM IST

मोतीलाल व्होरा काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष बनणार ?

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पदाच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण, याविषयी चर्चा रंगली आहे. सध्या ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे. व्होरा यांनी याआधी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. दरम्यान, व्होरा यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. याविषयी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर -

तिवरे धरणाचे बांधकाम शिवसेनेच्या विद्यमान आमदाराचेच; आता मात्र झटकली जबाबदारी

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर आता याला राजकीय रंग चढू लागला आहे. या प्रकरणी आता हे धरण बांधलेल्या खेमराज कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात बोट उगारलं जात आहे. मात्र, तिवरे धरण फुटीत आपला काहीच दोष नसल्याचा दावा शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांनी केला आहे. वाचा सविस्तर -

तिवरे धरण: अवघ्या १९ वर्षातच धरण फुटले कसे?; वडेट्टीवारांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेले मृत्यू सरकारच्या निष्क्रीयतेचे बळी आहेत. धरण नादुरुस्त असल्याच्या तक्रारी आल्यानंतरही सरकारने कारवाई केली नाही. त्यामुळे या घटनेला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे सरकारवर ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करावा. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच हे धरण बांधलेल्या स्थानिक सदानंद चव्हाण यांच्या कंपनीला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. गांधीभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाचा सविस्तर -

'वंचित'चा काँग्रेसला अल्टीमेटम; 40 जागा देतो, 10 दिवसात कळवा

मुंबई - लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला हादरा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आज पुन्हा एकदा बॉम्ब टाकला आहे. आमची 288 विधानसभा लढायची तयारी आहे, आम्ही काँग्रेसला 40 जागा देण्यास तयार आहे, मान्य असल्यास 10 दिवसात कळवावे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. आज मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पडळकर माध्यमांशी बोलत होते. वाचा सविस्तर -

अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालयला जुगारप्रकरणी अटक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालय दसानीला गॅब्लिंग रॅकेट प्रकरणात अंबोली पोलिसांनी काल अटक केली होती. नंतर त्याला जामिनावर मुक्त करण्यात आले. भाग्यश्रीने १९९० मध्ये हिमालय दसानीसोबत विवाह केला होता. आपल्या करियरच्या शिखरावर असताना तिने विवाह केला होता. वाचा सविस्तर -

बातमी, सर्वांच्या आधी ...

Intro:Body:

मोतीलाल व्होरा काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष बनणार ?

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पदाच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण, याविषयी चर्चा रंगली आहे. सध्या ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे. व्होरा यांनी याआधी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. दरम्यान, व्होरा यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. याविषयी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तिवरे धरणाचे बांधकाम शिवसेनेच्या विद्यमान आमदाराचेच; आता मात्र झटकली जबाबदारी

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर आता याला राजकीय रंग चढू लागला आहे. या प्रकरणी आता हे धरण बांधलेल्या खेमराज कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात बोट उगारलं जात आहे. मात्र, तिवरे धरण फुटीत आपला काहीच दोष नसल्याचा दावा शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांनी केला आहे.

तिवरे धरण: अवघ्या १९ वर्षातच धरण फुटले कसे?; वडेट्टीवारांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेले मृत्यू सरकारच्या निष्क्रीयतेचे बळी आहेत. धरण नादुरुस्त असल्याच्या तक्रारी आल्यानंतरही सरकारने कारवाई केली नाही. त्यामुळे या घटनेला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे सरकारवर ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करावा. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच हे धरण बांधलेल्या स्थानिक सदानंद चव्हाण यांच्या कंपनीला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. गांधीभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'वंचित'चा काँग्रेसला अल्टीमेटम; 40 जागा देतो, 10 दिवसात कळवा

मुंबई - लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला हादरा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आज पुन्हा एकदा बॉम्ब टाकला आहे. आमची 288 विधानसभा लढायची तयारी आहे, आम्ही काँग्रेसला 40 जागा देण्यास तयार आहे, मान्य असल्यास 10 दिवसात कळवावे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. आज मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पडळकर माध्यमांशी बोलत होते.

अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालयला जुगारप्रकरणी अटक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालय दसानीला गॅब्लिंग रॅकेट प्रकरणात अंबोली पोलिसांनी काल अटक केली होती. नंतर त्याला जामिनावर मुक्त करण्यात आले. भाग्यश्रीने १९९० मध्ये हिमालय दसानीसोबत विवाह केला होता. आपल्या करियरच्या शिखरावर असताना तिने विवाह केला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.