मुंबई - मुलुंड पश्चिम येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील बाल राजेश्वर महादेव मंदिरासमोर एक भली मोठी गुलाबी रंगाची 'कुर्ती' उभी करण्यात आली आहे. या कुर्तीच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडावे हाच उद्देश्य असल्याचे सांगण्यात येत आहे. 'ग्लोबल बुक अॅण्ड रिसर्च'मध्ये या कुर्तीची नोंद करण्यात आली आहे. तर, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी ही पाठवण्यात येणार असल्याचे कुर्ती तयार करणाऱ्या निखिल उपाध्याय आणि परमेश्वरी गुप्ता यांनी सांगितले.
देशातील विविध राज्यात महिला व मुली परिधान करतात. या कुर्तीची तब्बल २७ फुट उंच प्रतिकृती ही मुलुंडमध्ये उभारण्यात आली आहे. निखिल उपाध्याय आणि परमेश्वरी गुप्ता या दोघांनी मिळून ही भव्य कुर्ती तयार केली असून ही कुर्ती 27 फूट उंच आणि 9 फूट रुंद आहे. ही कुर्ती तयार करण्यासाठी 70 मीटर कापड वापरण्यात आला आहे.
हेही वाचा - मुंबई : घाटकोपरच्या पोलीस वसाहतीच्या कामाचे मार्ग मोकळे
निखिल आणि परमेश्वरी ने ४ दिवस राबून ही कुर्ती तयार केली असून यामध्ये विविध प्रकारची कलाकुसर देखील करण्यात आली आहे. याची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'सह इतर रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे. या भव्य कुर्तीचा आढावा घेत निखिल आणि परमेश्वरी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनुभव भागवत यांनी...
हेही वाचा - 'संजय राऊतांना आपण काय बोलतोय याचे भान नाही'