मुंबई : मुंबई शहर समुद्र किनारी असल्याने समुद्राला भरती असल्यावर समुद्रातील पाणी शहरात येते. तसेच मोठा पाऊस असल्यावर पालिकेने शहरातील पाणी पम्पिंग स्टेशनच्या माध्यमातून समुद्रात सोडण्यासाठी यंत्रणा उभारली आहे. ही यंत्रणा बंद करावी लागते. भरती संपल्यावर शहरातील पाणी समुद्रात सोडले जाते. याच कालावधीत सतत पाऊस पडत असल्यास पाणी साचून जागतिक दर्जाचे शहर असलेली मुंबई ठप्प होते. यामुळे करोडो रुपयांचे नुकसान होते. यंदा जून २०२३ मध्ये ५ दिवस, जुलै मध्ये ६ दिवस, ऑगस्ट महिन्यात ८ दिवस तर संप्टेंबर महिन्यात ६ दिवस अशा २५ दिवसात ४.५ मीटरहून मोठ्या लाटा समुद्रात उसळणार आहेत. या कालावधीत नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नये. तसेच मोठा पाऊस असल्यास नागरिकांनी घराबाहेर न पडता काळजी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
जून २०२३ दिवशी समुद्रात मोठ्या लाटा -
- ४ जून दुपारी १२.१६ वाजता ४.६२ मीटर
- ५ जून दुपारी १३.०१ वाजता ४. ६९ मीटर
- ६ जून दुपारी १३.४७ वाजता ४. ६९ मीटर
- ७ जून दुपारी १४.३५ वाजता ४. ६२ मीटर
- ८ जून दुपारी १५.३५ वाजता ४.५१ मीटर
जुलै २०२३
- ३ जुलै दुपारी १२.०२ वाजता ४.६० मीटर
- ४ जुलै दुपारी १२.४९ वाजता ४.७२ मीटर
- ५ जुलै दुपारी १३.३६ वाजता ४.७८ मीटर
- ६ जुलै दुपारी १४.२३ वाजता ४.७७ मीटर
- ७ जुलै दुपारी १५.१० वाजता ४.६९ मीटर
- ८ जुलै दुपारी १५.५५ वाजता ४.५२ मीटर
ऑगस्ट २०२३
- १ ऑगस्ट सकाळी ११.४६ वाजता ४.५८ मीटर
- २ ऑगस्ट दुपारी १२.३० वाजता ४.७६ मीटर
- ३ ऑगस्ट दुपारी १३.१४ वाजता ४.७८ मीटर
- ४ ऑगस्ट दुपारी १३.५६ वाजता ४.७८ मीटर
- ५ ऑगस्ट दुपारी १४.३८ वाजता ४.७६ मीटर
- ६ ऑगस्ट दुपारी १५.२० वाजता ४.५१ मीटर
- ३० ऑगस्ट सकाळी ११.२६ वाजता ४.५९ मीटर
- ३१ ऑगस्ट दुपारी १२.०६ वाजता ४.८० मीटर
सप्टेंबर २०२३
- १ सप्टेंबर रात्री १२.२२ वाजता ४.५४ मीटर
- १ सप्टेंबर दुपारी १२.४४ वाजता ४.८८ मीटर
- २ सप्टेंबर रात्री १.०७ वाजता ४.६८ मीटर
- २ सप्टेंबर दुपारी १३.२२ वाजता ४.८४ मीटर
- ३ सप्टेंबर रात्री १.५२ वाजता ४.६७ मीटर
- ३ सप्टेंबर दुपारी १४.०१ वाजता ४.६६ मीटर
- २८ सप्टेंबर सकाळी ११.०० वाजता ४.५६ मीटर
- २९ सप्टेंबर सकाळी ११.३७ वाजता ४.७१ मीटर
- ३० सप्टेंबर रात्री १२.०८ वाजता ४.७४ मीटर
- ३० सप्टेंबर दुपारी १२.१२ वाजता ४.७३ मीटर
हेही वाचा: Indian Navy Helicopter Crashed मुंबईजवळ भारतीय नौसेनेचे हेलिकॉप्टर कोसळले जीवितहानी नाही