ETV Bharat / state

Lodha Haven Area: शांती उपवन इमारतीला तडे गेल्याने २४० कुटुंबांचे स्थलांतर, लोढा कंपनीने जबाबदारी नसल्याचा केला खुलासा - लोढा हेवन

डोंबिवली येथील लोढा हेवन गृहप्रकल्पातील, शांती उपवन या इमारतीच्या समूहातील एका इमारतीला तडे गेल्याने रहिवाशी भयभीत झाले. त्यानंतर छत सुद्धा कोसळू लागले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे ५ इमारतीमधील २४० कुटुंबांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तसेच विस्थापित झालेल्या काही रहिवाशांना येथील एका शाळेत आश्रय दिला गेला आहे.

Lodha Haven Area
शांती उपवन इमारतीला तडे
author img

By

Published : Mar 6, 2023, 10:59 AM IST

मुंबई : डोंबिवली शिळफाटा रस्त्यावरील लोढा हेवन गृहप्रकल्पातील शांती उपवन मधील एफ इमारतीला शनिवारी रात्री अकरा वाजता तडे जाण्यास सुरुवात झाली. त्यानंतर छत सुद्धा कोसळू लागल्याने रहिवाशी प्रचंड घाबरले. रहिवाशांना सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडा अन्यथा मोठा अनर्थ घडेल अशी समजूत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकढून देण्यात आली. नागरीक आवश्यक ते सामान घेऊन घरावर पडले. शांती उपवन इमारती १९९८ मध्ये एका विकासकाच्या मार्गदर्शनाखाली या भागातील एका लोकप्रतिनिधीच्या बांधकाम कंपनीने ही इमारती बांधल्या होत्या.

अनेक वर्ष देखभाल, दुरुस्ती नाही: याबद्दल बोलताना कल्याण डोंबिवली पालिकेचे ई विभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी सांगितले की, पालिकेच्या संरचनात्मक अभियंत्याचा सल्ला घेऊन या इमारतींबाबत योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु इमारतींचे अनेक वर्ष देखभाल, दुरुस्ती केली नसल्याने असा प्रकार घडल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. शनिवारी रात्री अकरा वाजता तडे जाण्यास सुरुवात झाली व छत कोसळू लागले, असे प्रत्यक्ष दर्शनी रहिवाशांनी सांगितले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बारावी, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्याने येथे राहणारे विद्यार्थी व त्यांचे पालक फार मेटाकुटीला आले आहे. पुढचे दिवस कसे काढायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

लोढा ग्रुपचा काही संबंध नाही: शनिवारी रात्री अचानक झालेल्या प्रकारानंतर इमारतीमधील २४० कुटुंबीयांना रात्रीच घरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. इमारत खचू लागल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. त्यांनी विकासकाच्या विरुद्ध आंदोलन केले. रविवारी रात्री पलावा चौकात धरणे आंदोलन केले. विकासकाने तातडीने घर देण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान रस्त्यावरील शांती उपवन मधील इमारती लोढा किंवा मॅक्रोटेक डेव्हलपर्स यांनी बांधलेल्या नाहीत. तसेच लोढा हेवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांती उपवन इमारतींशी आमचा काही संबंध नाही. या इमारती २० वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या आहेत, असा खुलासा लोढा कंपनीच्या प्रवक्त्याने करून या प्रकरणाची आपला कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा: Earthquake In Satara भूकंपाच्या मालिकेने माणदेश हादरला १५ घरांना तडे गेल्याने नागरिक भयभीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.