ETV Bharat / state

दिलासादायक..! मुंबईच्या 231 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये चौदा दिवसात एकही नवा रुग्ण नाही - मुंबईच्या 231 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये चौदा दिवसात एकही नवा रुग्ण नाही

मुंबईमध्ये रोज शेकडो रुग्ण नव्याने आढळून येत असले तरी 231 कंटेनमेंट झोन असे आहेत, ज्यात गेल्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे पालिकेने या विभागांना कंटेनमेंट झोनच्या यादीतून वगळले आहे. यामुळे आता कंटेनमेंट झोनची संख्या 805 वर आली आहे.

मुंबईच्या 231 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये चौदा दिवसात एकही नवा रुग्ण नाही

author img

By

Published : Apr 28, 2020, 8:15 AM IST

Updated : Apr 28, 2020, 10:23 AM IST

मुंबई - शहरात कोरोनाच्या रुग्णांनी 5 हजाराचा टप्पा पार केला आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत, त्या विभागांना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. मुंबईत कंटेनमेंट झोनची संख्या 1 हजार पार गेली होती. मात्र, आता 231 झोनमध्ये गेल्या 14 दिवसात एकही रुग्ण आढळून आला नसल्याने हे विभाग कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात आले आहेत.

मुंबईमधील कंटेनमेंट झोनची संख्या आता 805 वर आल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईत 11 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर ज्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले त्या विभागाला सील करत कंटेंनमेंट झोन म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. मुंबईत अशा विभागांची संख्या 1036 वर पोहोचली होती. या विभागात आणखी काही रुग्ण आढळून येतात का, हे तपासण्यासाठी पालिकेने मोहिम सुरु केली आहे. यामधून हजारो रुग्ण समोर आले आहेत.

मुंबईमध्ये रोज शेकडो रुग्ण नव्याने आढळून येत असले तरी 231 कंटेंनमेंट झोन असे आहेत, ज्यात गेल्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे पालिकेने या विभागांना कंटेनमेंट झोनच्या यादीतून वगळले आहे. यामुळे आता कंटेनमेंट झोनची संख्या 805 वर आली आहे. मुंबई महापालिकेने जरी या 231 झोनला यादीतून वगळले असले तरी लॉकडाऊनचे नियम मात्र त्यांना पाळावेच लागणार आहेत.

महापौर, किशोरी पेडणेकर

आतापर्यंत जे विभाग कंटेनमेंट झोनमध्ये नव्हते त्या विभागांमधील नागरिकांनाच अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तू घ्यायला बाहेर पडता येत होते. त्याचप्रमाणे आता या कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात आलेल्या विभागामधील नागरिकांनाही बाहेर पडायला मिळणार आहे, असे महापौरांनी सांगितले आहे.

Last Updated : Apr 28, 2020, 10:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.