मुंबई - मुंबईमधून गुरुवारी एकाच दिवशी 2 हजार 141 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आतापार्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 39 हजार 151 वर पोहचली आहे. तर गुरुवारी नवीन 1 हजार 365 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 98 जणांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 70 हजार 990 वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा 4 हजार 60 वर पोहचला आहे.
मुंबईमधून गुरुवारी एकाच दिवशी 2 हजार 141 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापार्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 39 हजार 151 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 27 हजार 779 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. गुरुवारी 98 बाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी 58 मृत्यू गेल्या 48 तासांमधील आहेत. तर 40 मृत्यू 48 तासांपूर्वीचे आहेत. 120 मृत्यूपैकी 69 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 62 पुरुष आणि 36 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 7 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 51 जणांचे वय 60 वर्षावर तर 40 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी 134 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर तिघांचा मृत्यू
मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 55 टक्क्यांवर पोहचला आहे. 18 ते 24 जून पर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.72 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दर वाढीचा दर 40 दिवसांवर पोहचला आहे. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशा 756 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभागात कंटेनमेंट झोन म्हणून सिल करण्यात आले आहेत. तर कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6 हजार 5 इमारतीमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सिल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.