ETV Bharat / state

Road Accident Death : बापरे! मुंबईत नऊ महिन्यात २१४ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

author img

By

Published : Nov 27, 2022, 9:56 PM IST

मुंबईत ९ महिन्यात (Mumbai in nine months) एक हजार तीनशे अठ्ठ्यानव रस्ते अपघात झाले असून; त्यात २१४ जणांचा मृत्यू (214 people died in road accidents) झाला आहे. या अपघातांची गेल्या वर्षीच्या अपघातांशी तुलना केल्यास अपघाताचे प्रमाण कमी आहे. मात्र, अपघाताचे प्रमाण कमी झाले तरी, मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. Road Accident Death

Road Accident Death
रस्ते अपघातात मृत्यू

मुंबई : निष्काळजीपणे वा मद्यपान करून वाहन बेदरकारपणे चालवणे यांसह अन्य कारणांमुळे मुंबईतील रस्ते अपघातांची संख्या कमी होताना दिसत नाही. उलटपक्षी अपघातांचे सत्र वाढतच आहे. परिवहन विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार यंदा जानेवारी ते सप्टेंबर म्हणजेच ९ महिन्यात (Mumbai in nine months) मुंबईत एक हजार तीनशे अठ्ठ्यानव रस्ते अपघात झाले असून; त्यात २१४ जणांचा मृत्यू (214 people died in road accidents) झाला आहे. Road Accident Death

परिवहन विभागाची माहिती : राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी दरवर्षी राज्य सरकार नवनवीन रस्ते सुरक्षा मोहीम राबवते. त्यामध्ये वाहतूक पोलीस, परिवहन विभागासोबतच अनेक सामाजिक संस्था देखील सहभागी होतात. मात्र, या मोहिमेनंतर देखील अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मद्यपान करून वाहन चालविणे, निष्काळजीपणे वाहन चालविणे, ओव्हरटेक करणे, रस्त्यांवरील खड्डे आदी इतर करण्यामुळे राज्यात रस्ते अपघात होतंच आहेत. शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही अपघातांचे आणि मृत्यूचे प्रमाण देखील अधिकच असते. मुंबई शहरांतही रस्ते अपघाताचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. परिवहन विभागाकडून त्याचा प्रत्येक महिन्याला आढावा घेतला जातो.

नऊ महिन्यातील अपघात : परिवहन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते सप्टेंब्र २०२२ मध्ये १ हजार तीनशे ९८ रस्ते अपघातात झाले. या अपघातात २१४ जणांचा मृत्यू झाला. तर १ हजार २७१ जण जखमी झाले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर २०२१ मध्ये अपघातांची संख्या एक हजार सहाशे त्रेचाळ होती. तर मृत्यू झालेल्यांची संख्या २९० होती आणि जखमींची संख्या १ हजार ४०७ इतकी होती.

यंदा मृत्यूचे प्रमाण जास्त : या अपघातांची गेल्या वर्षीच्या अपघातांशी तुलना केल्यास ती कमी आहे. अपघाताचे प्रमाण कमी झाले तरी, मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. ठाण्यात देखील जानेवारी ते सप्टेंबरमध्ये सहाशे २८ रस्ते अपघात झाले आहेत. त्यात १७९ जणांचा मृत्यू झाला असून; ५४३ जण जखमी झाले आहेत. तसेच गेल्या वर्षी या कालावधीत ५७१ अपघात झाले असून; त्यात १४४ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५१६ जण जखमी झाले होते. राज्यात रस्ते अपघातांत मृत्यू झालेल्यांची संख्या २५ ते ४५ या वयोगटातील सर्वाधिक आहेत. Road Accident Death

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.