ETV Bharat / state

आरएसएस-भाजप ब्लॅकमेलर; प्रकाश आंबेडकरांचा जळगावात घणाघात - लोकसभा निवडणूक

दिवसभरातील राजकीय घडामोडींचा दृष्टीक्षेप

मतकंदन
author img

By

Published : Mar 22, 2019, 5:38 PM IST

Updated : Mar 22, 2019, 11:55 PM IST

आरएसएस-भाजप ब्लॅकमेलर; प्रकाश आंबेडकरांचा जळगावात घणाघात

जळगाव - आरएसएस आणि भाजप दोन्ही ब्लॅकमेलर आहेत. त्यांनी मलाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता, अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी दुपारी जळगावात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांसाठी जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ते बोलत होते. वाचा सविस्तर

नांदेडमध्ये काँग्रेसचा 'गड' शाबूत राहणार की भाजपचा 'प्रताप' घडणार ?

नांदेड - काँग्रेसचा गड शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण जिल्ह्यातील सर्व जाती-धर्माची वेगळी बैठक घेत आहेत. त्यांनी सोशल इंजिनियरिंगचा प्रयोग सुरू केला आहे. तर दुसरीकडे भाजपनेही काँग्रेसच्या गडाला पोखरून नवा 'प्रताप' घडवण्यासाठी बूथ पातळीपर्यंत काम सुरू केले आहे.काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षानी 'वेट अँड वॉच' ची भूमिका घेतली आहे. एकमेकांचा उमेदवार पाहून आपला 'पत्ता' समोर कसा करता येईल याची वाट पाहत आहेत. वाचा सविस्तर

राधाकृष्ण विखे पाटलांसह त्यांचा परिवार मला मदत करणार; सदाशिव लोखंडेंचा 'गौप्यस्फोट'

अहमदनगर- शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना शिर्डी मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना शिवसेना दक्षिणेत सुजय विखेंना मदत करेल, तर शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांचा परिवार मला मदत करणार असल्याचा गौप्यस्फोट लोखंडे यांनी केला. वाचा सविस्तर

लोकसभेला पराभव झाल्यास आमचे राजकारण संपेल, महादेवराव महाडिक यांना भीती

कोल्हापूर- लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यास जिल्ह्यातील आमचे राजकारण संपणार असल्याची भीती माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केली आहे. ते गुरुवारी खुपिरे येथे कार्यकर्त्यांशी बोलत होते. चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, अजून निवडणुका महिनाभर लांब असतानाच त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर

अकोला मतदारसंघ : काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची प्रतीक्षा

अकोला - लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू असतानाच अकोल्यातून भाजपने आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले. परंतु, अद्यापही काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचे नाव जाहीर न झाल्याने भाजपच्या उमेदवाराला कोण टक्कर देईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांनी भाजपला चांगली टक्कर दिली होती. लोकसभा निवडणुकीचे नाम निर्देशन पत्र भरण्याची २६ तारीख ही शेवटची आहे. वाचा सविस्तर

माझ्यावर कुणीही दबाव आणू शकत नाही, पूर्ण विचार करूनच निलेश राणेंना उमेदवारी - नारायण राणे

सिंधुदुर्ग - निलेश राणेंना पूर्ण विचार करूनच उमेदवारी दिलेली आहे. कुणीही माझ्यावर दबाव आणू शकत नाही. काहीही झाले तरी निवडणूक लढवणारच. उमेदवारी मागे घेणे माझा पिंड नसल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर

तिकीट नाकारल्याने दिलीप गांधी अपक्ष लढणार?; रविवारी समर्थकांच्या मेळाव्यात निर्णय

अहमदनगर - दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी नाकारत डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिल्याने गांधी समर्थक नाराज झाले आहेत. गांधी यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते आग्रही असून त्यासाठी येत्या रविवारी समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात खा.गांधी यांनी अपक्ष ही निवडणूक लढवावी असा आग्रह केला जाणार आहे. वाचा सविस्तर

...हा तर भाजपचा धोरणात्मक निर्णय, शरद पवारांचा पलटवार

पुणे -भाजपने सध्याविरोधी पक्षातील नेते स्वतःच्या पक्षात सामावून घेण्याचाधोरणात्मक निर्णय घेतलेला दिसतो आहे, असा उपरोधीक टोला शरद पवारांकडून लगावण्यात आला. ते बारामतीत बोलत होते. यावेळी त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उस्मानबादमधून राणा जगतसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. वाचा सविस्तर

सांगलीत भाजप उमेदवार संजय पाटलांच्या समर्थनावरून शिवसेनेतच जुंपली; सेनेत गटबाजीला उधाण

सांगली - सांगली मतदारसंघासाठी युतीने भाजप खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, शिवसेनेत त्यांना समर्थन देण्यावरून दोन गट तयार झाले आहेत. अधिकाराचा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख संजय विभूतेंच्या गटाने, दुसऱ्या गटावर परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप केला आहे. तर विभूतेंच्या गटाची भूमिका युतीच्या उमेदवाराविरोधात असल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी केला आहे. या दोन्ही गटाने एकमेकांच्या हकालपट्टी करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. वाचा सविस्तर

आता निवडणूक लढणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत मोदी-शहांचा विरोध करणार - बी. जी. कोळसे पाटील

मुंबई - वंचित बहुजन आघाडीचा बिनशर्त दिलेला पाठिंबा नाकारला आहे. कारण जातीयवादी, विषारी विचारांच्या संघप्रणीत भाजपला रोखू शकण्याची ताकद असलेल्या एकमेव काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्यात वंचित आघाडीला अपयश आले आहे. त्यामुळे गेल्या ५ वर्षांत मी मोदी-शहा विरोधात घेतलेल्या ठाम भूमिकेला या आघाडीच्या भूमिकेमुळे तडा गेला आहे. याची मला खात्री पटली आहे. यापुढेही मोदी- शहांना रोखण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. वाचा सविस्तर

माढ्यातून संजय शिंदे, तर उस्मानबादमधून राणा जगतसिंह पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उस्मानबादमधून राणा जगतसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वाचा सविस्तर

पवारांचा उस्‍मानाबादमध्ये मास्टरस्ट्रोक, खासदारकीसाठी २ भावात होणार लढत

उस्मानाबाद -दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनीलोकसभेचे उमेदवार घोषित केले आहेत. शिवसेनेकडूनतालुक्याचे माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तर राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. यामुळे उस्‍मानाबाद मतदारसंघात दोन भावात होणार लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. वाचा सविस्तर

राष्ट्रवादीच्या भारती पवारांचा भाजप प्रवेश, दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी?

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष भारती पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी भारती पवार इच्छुक होत्या. मात्र, ऐनवेळी दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्याने पवार यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. वाचा सविस्तर

आमची खरी लढाई युतीशी, आघाडीला आम्ही गृहीत धरत नाही - आंबेडकर

जळगाव - लोकसभा निवडणुकीत आमची खरी लढाई भाजप आणि शिवसेना युतीशी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या रेसमध्ये कुठेही नसून आम्ही त्यांना गृहीत धरतच नाही, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज जळगावात केले. वाचा सविस्तर

साताऱ्यातून नरेंद्र पाटलांना उमेदवारी? 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची घेतली भेट

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व सध्या भाजपमध्ये असलेले नरेंद्र पाटील यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. साताऱ्यातून शिवसेनेच्या तिकीटावर ते निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. वाचा सविस्तर

मुख्यमंत्र्यांनी खासदार संजय काकडे यांची नाराजी केली दूर

मुंबई - मागील काही दिवसांपासून भाजप बद्दल जाहीर नाराजी व्यक्त करत काँग्रेस मध्ये जाणार असल्याचे सांगणारे खासदार संजय काकडे आज भाजपच्या मंचावर उपस्तिथीत होते. यावेळी काकडे यांची नाराजी दूर झाल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केले. ते पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी काँग्रेस मध्ये जाण्याची पूर्ण तयारी काकडे यांनी केली होती. मात्र काँग्रेसमध्येही उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात येताच, त्यांनी भाजप मध्येच राहण्याचा निर्णय घेतला. वाचा सविस्तर

सनातनशी संबंधांवरून काँग्रेसचे उमेदवार बांदिवडेकर अडचणीत

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर सध्या अडचणीत सापडले आहेत. बांदिवडेकर यांचा संबंध थेट सनातन संस्थेशी असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरु असल्याने एकच खळबळ उडाली आहे. याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. या प्रकारानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ट्वीट चौकशी करून पक्ष त्यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेईल, असे म्हटले आहे. मात्र, मतदारसंघातील आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बांदिवडेकरांचा पाठराखण केले आहे. वाचा सविस्तर

प्रवीण छेडांची घरवापसी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश

मुंबई - काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक प्रवीण छेडा यांनी घरवापसी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्तिथीत भाजपमध्ये प्रवेश केला. रामाचा वनवास 14 वर्षाचा होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी माझा वनवास कमी केला असून, पक्ष देईल ती जबाबदारी पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य छेडा यांनी केले. वाचा सविस्तर

शिवसेनेची लोकसभेसाठीची पहिली २१ उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे.राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघापैकी भाजप २५ तर शिवसेना२३ जागा लढवणार आहे. यापैकी शिवसेनेने २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पालघर आणि सातारा या दोन मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्याप केली नसून २४ तारखेला याबाबतचा निर्णय होणार आहे, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली. वाचा सविस्तर

दहा वर्षात जिल्ह्याचे वाटोळे, आता पार्सल जिल्ह्याबाहेर पाठवणार - गुणवंत देवपारे

अमरावती - आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची घोषणा केल्यामुळेच भाजप आणि शिवसेनेची युती झाली. अमरावतीच्या विद्यमान खासदाराने दहा वर्षात जिल्ह्याचे वाटोळे केले आहे. येत्या निवडणूकीत हे पार्सल मी साताऱ्याला पाठवणार आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अमरावती लोकसभा मतदार संघाचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी केली. वाचा सविस्तर

भाजपच्या पहिल्याच बैठकीला खासदार सुनील गायकवाडांची दांडी

लातूर - राज्यातील मतदार संघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुढील नियोजनासाठी शुक्रवारपासून भाजपच्या बैठका पार पडत आहेत. लातूरमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीत विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांच्या अनुपस्थितीची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. पुन्हा तिकिट न मिळाल्याने सुनील गायकवाड हे नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे. लातूरातून भाजपकडून विद्यमान खासदार गायकवाडांच्या जागी सुधाकरराव श्रृगांरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वाचा सविस्तर

ईशान्य मुंबई लोकसभा : आठवलेंना उमेदवारी न दिल्यास आरपीआय कार्यकर्ते बंड पुकारणार

मुंबई - ईशान्य मुंबईच्या लोकसभेची उमेदवारी रामदास आठवले यांना द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) केली आहे. रामदास आठवले यांना उमेदवारी न दिल्यास रिपाइंचे कार्यकर्ते बंड पुकारतील यामुळे भाजप शिवसेनेला सत्ता गमवावी लागेल असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला. वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी बीड दौऱ्यावर येण्याची शक्यता; ६ एप्रिलला अंबाजोगाईत सभा

बीड - पंतप्रधान नरेंद्र मोदी बीड दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ ते ६ एप्रिलला अंबाजोगाईत सभा घेतील. विशेष म्हणजे मागील निवडणुकीवेळी गोपीनाथ मुंडेंनी नरेंद्र मोदींची सभा नाकारली होती. प्रीतम मुंडे यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याशी होत असून अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या ४ दिवस उरले आहेत. वाचा सविस्तर

Intro:लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या 21 उमेदवारांची पहिली यादी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आज मातोश्रीवर जाहीर केली. या यादीत पुन्हा काही विद्यमान खासदारांना संधी देण्यात आली आहे. मात्र उस्मानाबादमध्ये विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना डावलून ओमराजे निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे.

Body:मात्र या यादीत सातारा आणि पालघर या दोन जागांची नाव अद्याप जाहीर करण्यात आली नाही. येत्या 24 तारखेला कोल्हापूर मध्ये होणाऱ्या युतीच्या जाहीर सभेत या दोन नावांची घोषणा करण्यात येणार आहे.
पालघरच्या जागेसाठी श्रीनिवास वनगा यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व सध्या भाजपमध्ये असलेले आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सातारामधुन शिवसेनेतून ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Conclusion:शिवसेना 23 जागा जिंकेल असा विश्वास यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
Last Updated : Mar 22, 2019, 11:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.