ETV Bharat / state

धारावीतील निसर्ग उद्यानात २०० बेडचे कोरोना केंद्र सुरू

धारावीत निसर्ग उद्यानात ऑक्सिजन बेडसह अत्याधुनिक सुविधा असलेले २०० बेडच्या क्षमतेचे कोरोना केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामुळे दादर, माहिम, धारावीतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

200 beds Corona center started in  nature park in dharavi
धारावीतील निसर्ग उद्यानात २०० बेडचे कोरोना केंद्र सुरू
author img

By

Published : Jun 19, 2020, 10:15 PM IST

मुंबई - दिवसेंदिवस मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पालिका, खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत. स्टेडियम, मोकळी उद्याने याठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटर उभारली जात आहे. याचाच एक भाग म्हणून धारावीत निसर्ग उद्यानात ऑक्सिजन बेडसह अत्याधुनिक सुविधा असलेले २०० बेडच्या क्षमतेचे कोरोना केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामुळे दादर, माहिम, धारावीतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

200 beds Corona center started in  nature park in dharavi
धारावीतील निसर्ग उद्यानात २०० बेडचे कोरोना केंद्र सुरू

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोना संसर्ग प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर धारावी परिसरातील संसर्गाला रोखण्यासाठी संस्थात्मक अलगीकरण वाढवण्याच्या महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार कोरोना केंद्रांची संख्या वाढवण्यात आली व अलगीकरणावर भर देण्यात आला. याचा परिणाम म्हणून धारावीतील संसर्गाला रोखण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यासोबत आता ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले व परिपूर्ण सुविधांसह सुसज्ज असे महाराष्ट्र निसर्गोद्यान कोरोना आरोग्य केंद्र कार्यान्वित झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांनी सातत्याने भेटी देऊन हे केंद्र लवकरच कार्यान्वित व्हावे, यासाठी जी/उत्तर विभाग कार्यालयाला मार्गदर्शन केले आहे. विख्यात अभिनेता अजय देवगण यांचे एनवाय फाऊंडेशन आणि आपत्ती व्यवस्थापनासह आरोग्य क्षेत्रातील जगविख्यात अमेरिकेअर्स यांनी या केंद्रातील ऑक्सिजन सुविधेसाठी सहाय्य पुरवले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानसमोरील मोकळ्या जागेवर जी- उत्तर विभाग कार्यालयाच्या माध्यमातून २०० रुग्ण क्षमतेचे हे केंद्र कार्यान्वित झाले आहे. अंदाजे २ हजार २०० चौरस फूट क्षेत्रफळावर जलावरोधक (वॉटर प्रूफ) उभारण्यात आलेल्या या केंद्रामध्ये प्रत्येक रुग्‍णाच्‍या बेडला ऑक्सिजनचा पुरवठा आहे. मध्यम स्वरुपाची बाधा झालेल्या कोरोनाबाधितांना त्याचा खासकरुन लाभ होणार आहे. प्रत्येक बेडसमवेत पंखे, प्रत्येक रुग्णाला त्यांचे वैयक्तिक साहित्य ठेवण्यासाठी कपाट तसेच स्वच्छ गादी, उशी, बेडशीट यांची काळजीपूर्वक व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक रुग्णासाठी गरम पाणी, सकाळी व सायंकाळी अल्पोपहार, दुपारी व रात्री जेवण यासह दूध आदी पोषक आहार पुरवला जात आहे. तसेच रुग्णांची गरज लक्षात घेऊन औषधांचा पुरेसा साठादेखील उपलब्ध असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

रुग्णसेवेसाठी ३ सत्रांमध्ये १० डॉक्टर्स, १५ नर्स आणि तत्सम इतर कामे करण्यासाठी ७० वॉर्डबॉय नेमण्यात आले आहेत. तसेच मदतीसाठी ७० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा योग्यरित्या व सुरळीत होण्यासाठी पुरेसे सिलेंडर्स उपलब्ध असून, त्याबाबत आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच या केंद्रासाठी स्वतंत्र व २४ तास उपलब्ध असणारी रुग्णवाहिकाही तैनात आहे.

रुग्णांच्या तापमानावर लक्ष ठेवण्यासाठी थर्मल कॅमेरे-रुग्‍णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तसेच रुग्णांच्या शारीरिक तापमानावर सतत लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक असे थर्मल कॅमेऱ्याची व्यवस्था आहे. त्याद्वारे डॉक्टर्स संबंधित रुग्णांचे तापमान सातत्याने पाहू शकतात. या केंद्रामध्ये ५० फ्लड लाइट लावण्यात आले आहेत. तर एकूण २५ स्नानगृहे, २५ प्रसाधनगृहे यांची व्यवस्था आहे. डॉक्टर व इतर कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र स्नानगृहे व प्रसाधनगृहे यांची व्यवस्था आहे. दिवसभरातून किमान ४ ते ५ वेळा स्वच्छता करण्याची खबरदारी घेतली जाते, अशी माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.