ETV Bharat / state

दादरच्या शुश्रूषा रुग्णालयातील दोन परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह; दादरमध्ये रुग्णांची संख्या 6 वर - कोरोना पॉझिटिव्ह नर्स

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना या विषाणचा संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढत आहे. दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात काम करणाऱ्या दोन नर्सेसला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Corona Positive
कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : Apr 10, 2020, 12:20 PM IST

मुंबई - मुंबईमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना या विषाणचा संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढत आहे. दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात काम करणाऱ्या दोन नर्सेसला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच दादर विभागात एका 83 वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे दादरमधील कोरोना रुग्णांची संख्या आता सहा झाली आहे.

मुंबईत साई, ओकहार्ड, जसलोक, भाटिया, केईएम, सायन या रुग्णालयांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यात आता दादर पश्चिम येथील शुश्रूषा रुग्णालयाचाही समावेश झाला आहे. शुश्रूषा रुग्णालयात काम करणाऱ्या 27 आणि 42 वर्षीय दोन नर्सेसला कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, दादर येथे याअगोदर दिनकर अपार्टमेंटमध्ये 1, सौभाग्य अपार्टमेंटमध्ये 1, तावडे वाडीमध्ये 2 रुग्ण आढळून आले होते. त्यात आत शुश्रूषा रुग्णालयात 2 आणि एन सी केळकर रोडवर एक असे तीन रुग्ण आढळून आल्याने दादरमधील रुग्णांची संख्या 6 झाली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.