मुंबई: दुबईहून मुंबईला येणाऱ्या इंडिगोच्या विमानात अनधिकृतरित्या दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या दोन प्रवाशांना सहार विमानतळ पोलीसांनी अटक केली आहे. दारू पिऊन विमानातील कर्मचाऱ्यांसोबत शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
विमानात पिली दारू: दुबईहून मुंबईला येत असताना दोन प्रवाशांनी त्यांच्याजवळ असलेली दारू काढून विमानात प्यायला सुरुवात केली. यावेळी विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना विमानात दारू पिण्यास मज्जाव आहे. त्यामुळे विमानात दारू पिऊ नये असे सांगितले. मात्र विमानातील प्रवासी दत्तात्रय बापर्डेकर आणि जॉन डिसूजा यांनी त्याला दाद दिली नाही. त्यांनी आपले पिणे सुरूच ठेवले.
विमानात घालला गोंधळ: दोन प्रवाशांनी दारूच्या नशेत आपल्या जागेवरून उठून विमानात फिरण्यास सुरुवात केली. यासंदर्भात विमानातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा त्यांना हटकले. त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत शिवीगाळ करीत विमानात गोंधळ घातला. त्यांना कसेतरी विमानातील कर्मचाऱ्यांनी मुंबई विमानतळ येईपर्यंत थोपवून ठेवले. यासंदर्भात विमान कर्मचाऱ्यांनी सहार विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीसांनी जॉन जॉर्ज डिसूजा राहणार नालासोपारा आणि दत्तात्रय आनंद बापर्डेकर राहणार कोल्हापूर या दोघांनाही अटक केली आहे. विमानात गैरवर्तन करण्याच्या घटना अलीकडे जास्त वाढू लागल्या असल्याचे निदर्शनास येत आहे.