मुंबई : डीआरआयने मुंबई विमानतळावरून सुमारे २.५८ किलो कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत अंदाजे २५ कोटी रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाला अटक केली. प्रवाशाच्या सामानाची झडती घेतली असता, ट्रॉली बॅगमध्ये १२ साबण बारमध्ये ते लपवून ठेवलेले होते.
सापळा रचून अटक : जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, असे डीआरआयने म्हटले आहे. ज्या व्यक्तीला हे ड्रग डिलिव्हरी केले जात होते. त्याला पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. यानंतर तो पकडलाही गेला. त्याच्या सहप्रवाशाला अटक करण्यात आली आहे. त्याला डीआरआय कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
चौकशीसाठी प्रवाशी ताब्यात : डीआरआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून मुंबईला येणारा एक भारतीय प्रवासी करोडो रुपयांचे कोकेन घेऊन जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतरच डीआरआयच्या पथकाने २७ फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सापळा रचून संशयित प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
१२ साबणांमध्ये २५ कोटी ड्रग्ज : त्यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये १२ साबणाचे बार आढळून आले आणि ते फोडले असता प्रत्येक साबणाच्या आत ड्रग्ज लपवण्यात आले होते. त्याचे वजन केले असता ड्रग्ज २.५८ किलो असल्याचे आढळून आले. प्रवाशाने ते ट्रॉली बॅगमध्ये १२ साबणाच्या बारमध्ये लपवले होते. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे २५ कोटी रुपये आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी डीआरआयच्या कोठडीत केली. ही औषधे कोणाकडून आली? कुठे पाठवली जात होती? याचा शोध आता डीआरआय घेत आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
दहा लाखांचे ड्रग्ड जप्त : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ११ कडून एमडी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आरोपीला काही दिवसांपूर्वी 23 फेब्रूवारीला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात कलम ८ (क) राह २१ (क) एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोरेगाव पूर्व येथे संतोष नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली होती. शमसुद्दी उर्फ अज्यू मोहमद शेख, वय ४३ असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. शमसुद्दी उर्फ अज्यू मोहमद शेख, वय ४३ आरोपी गोरेगाव पूर्व परिसरातील दिंडोशी येथे राहतो. ड्रग्जची किंमत दहा लाख आहे.