ETV Bharat / state

मुंबईत बनावट नोटाप्रकरणी 2 आरोपी अटकेत, 1 फरार - मुंबई गुन्हे बातमी

आरोपी स्वतःच नोटा छापून बाजारात पसरवण्याच्या प्रयत्नात होते. ते मुंबईतील विरा देसाई रोड या ठिकाणी बनावट नोटा घेऊन येणार होते. मात्र, याआधीच गुन्हे शाखेने त्यांचा मनसुबा हाणून पाडला. या प्रकरणात अद्याप अजून एक आरोपी फरार आहे.

fake Currency
मुंबईत बनावट नोटाप्रकरणी 2 आरोपी अटकेत
author img

By

Published : Mar 8, 2020, 12:26 PM IST

मुंबई - बनावट नोटाप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 9 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये तब्बल 2 लाख 95 हजार रुपयांच्या 590 नोटा जप्त केलेल्या आहेत.

मुंबईत बनावट नोटाप्रकरणी 2 आरोपी अटकेत

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी स्वतःच नोटा छापून बाजारात पसरवण्याच्या प्रयत्नात होते. ते मुंबईतील विरा देसाई रोड या ठिकाणी बनावट नोटा घेऊन येणार होते. मात्र, याआधीच गुन्हे शाखेने त्यांचा मनसुबा हाणून पाडला. या प्रकरणात अद्याप अजून एक आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना त्यानेच या सगळ्या प्रकरणात मदत केल्याचे उघड झाले आहे. फरार आरोपी बनावट नोटा बनवण्याच्या प्रकरणात मास्टरमाईंड आहे.

हेही वाचा - राम मंदिरासाठी फक्त १ कोटी आणि मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी?

डॉन वरकी (26 वर्षे) आणि विष्णू विजयन (28) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते नवी मुंबई परिसरात वास्तव्यास होते. या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर फरार आरोपीला याआधी केरळमध्ये अशाच एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांनतर जामिनावर सुटून आल्यानंतर तो पुन्हा एकदा बनावट नोटा बनवण्यात सक्रिय झाला आहे.

आरोपींना अटक केल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपींच्या घरी छापा टाकला. यावेळी बनावट नोटा बनवण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये लॅपटॉप, प्रिंटर, टॅब, आरबीआय असे लिहिलेल्या पितळी पट्ट्या, वॉटरमार्क असलेले पेपर, आणि इतर साहित्याचा समावेश आहे.

हेही वाचा - ईडीकडून येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक, न्यायालयात हजर करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.