मुंबई- मुंबईत कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे पायाभूत सुविधा प्रकल्पाची कामे मात्र वेग घेताना दिसत आहेत. त्यानुसार मेट्रो -7 च्या कामानेही वेग घेतला आहे. मागील चार रात्रीत एकूण 18 सरकते जिने आणि 4 लिफ्ट मुंबईत दाखल झाल्या आहेत. यातील 12 सरकते जिने आणि 2 लिफ्ट साईटवर पोहोचल्या आहेत.
हेही वाचा- भिवंडी ते गोरखपूर विशेष श्रमिक ट्रेन 1104 कामगारांना घेऊन मध्यरात्री रवाना
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून मुंबईत अनेक मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनमध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आता काम वेगात सुरू आहे. तर आता मेट्रो-7 च्या कामाचा आणखी एक टप्पा पुढे गेला आहे. मागील चार रात्रीत मुंबईत 18 सरकते जिने आणि 4 लिफ्ट दाखल झाल्या आहेत.
12 सरकते जिने आणि 3 लिफ्ट आधी 30 कंटेनरमधून आल्या असून हे सरकते जिने-लिफ्ट साईटवर नेण्यात आल्या आहेत. 4 सरकते पोईसर, 4 मागाठाणे आणि 4 दिंडोशी या साईटवर दाखल झाल्या आहेत. तर दोन लिफ्ट आकुर्ली साईटवर नेण्यात आल्या आहेत. तर शनिवारी रात्री 15 कंटेनरमधून 6 सरकते जिने आणि 2 लिफ्ट मुंबई पोर्टवर दाखल झाल्या आहेत. आता लवकरच हे सरकते जिने आणि लिफ्ट साईटवर नेण्यात येतील.