ETV Bharat / state

Corona Update : मुंबईत ओमायक्रॉनचे १६५ तर एक्सबीबी व एक्सबीबी1 व्हेरियंटचे ६९ रुग्ण

कोरोनाच्या प्रसाराचा (Spread of Corona) शोध घेण्यासाठी मुंबई महापालिका (Mumbai Municipality) जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या (Genome sequencing test) करत आहे. नुकत्याच झालेल्या २३४ नागरिकांच्या चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएन्टचे १६५ रुग्ण (165 patients with Omicron) तर ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंट असलेल्या एक्सबीबी व एक्सबीबी1 व्हेरियंटचे ६९ रुग्ण (69 patients with XBB and XBB1 variants) सापडले आहेत. रुग्णआणि मृत्युसंख्या मात्र सध्या स्थिर आहे.

ओमायक्रॉन
Omicron
author img

By

Published : Nov 7, 2022, 2:51 PM IST

मुंबई : मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipality) कोरोनाच्या प्रसाराचा शोध घेण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जात आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या २३४ नागरिकांच्या चाचण्यांमध्ये १६५ रुग्ण ओमायक्रॉन व्हेरिएन्टचे तर ६९ रुग्ण ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंट असलेल्या एक्सबीबी व एक्सबीबी1 व्हेरियंटचे (XBB and XBB1 variants) सापडले आहेत. सब व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले असले तरी त्यामुळे रुग्ण आणि मृत्युसंख्या वाढलेली नाही. त्यामुळे मुंबईकर नागरिकांनी घाबरु नये. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क चा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार सुरु झाला. तेव्हापासून कोरोनाच्या ४ लाटा आल्या. कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंट आणि सब व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढली आहे याचा शोध घेण्यासाठी ऑगस्ट २०२१ पासून जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जात आहेत. नुकतीच १ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर दरम्यान २३४ कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात सर्व १०० टक्के अर्थात २३४ नमुने हे ओमायक्रॉन व्हेरिएन्टचे आहेत. यातील १५ टक्के अर्थात ३६ नमुने हे ओमायक्रॉच्या एक्सबीबी एक्सबीबी या सब व्हेरियंटचे आहेत. तर १४ टक्के म्हणजेच ३३ नमुने हे एक्सबीबी१ व एक्सबीबी1 या सब व्हेरियंटचे आहेत. १६५ रुग्ण ओमायक्रॉन व्हेरिएन्टचे तर ६९ रुग्ण ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंट असलेल्या एक्सबीबी व एक्सबीबी1चे आहेत.

चाचण्या करण्यात आलेल्या २३४ रुग्णांपैकी ० ते २० वर्षांमधील २४ (१० टक्के), २१ ते ४० वर्षांमधील ९४ (४० टक्के), ४१ ते ६० वर्षांमधील ६९ (२९ टक्के), ६१ ते ८० वर्षांमधील ३६ (१५ टक्के), ८१ ते १०० वर्षांमधील ११ (५ टक्के) रुग्ण आहेत. चाचण्या करण्यात आलेल्या २३४ नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील १६ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, ३ नमुने हे ० ते ५ वर्षे या वयोगटातील, ७ नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील; तर ६ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. या रुग्णांमध्ये कोविड बाधेची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.

एकूण २३४ बाधितांपैकी, ८७ जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. पैकी, १५ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील कोणालाही अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही. उर्वरित, १४७ जणांनी लस घेतलेली होती. त्यापैकी ७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील ओमायक्रॉन बाधित एका रुग्णास अतिदक्षता उपचारांची गरज भासली. तर २ वयोवृद्ध रुग्णांचा इतर सहव्याधींमुळे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या दोघांपैकी एक जण ८८ वर्षांचे पुरुष रुग्ण होते. त्यांना हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फुप्फुसांचा विकार होता. या सहव्याधींमुळे त्यांचा मृत्यू झाला. तर ७४ वर्ष वयाच्या महिला रुग्णास मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आदी विकार होते.

विविध सब व्हेरियंटची होणारी लागण लक्षात घेता, कोविड - १९ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने लसीकरण पूर्ण करुन घेणे, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर, नियमितपणे व योग्य प्रकारे साबण लावून हात धुणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात. ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटचे रुग्ण सापडले असले तरी त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे तसेच मृत्यूची संख्या वाढल्याचे समोर आलेले नाही. यामुळे मुंबईकर नागरिकांनी घाबरु नये. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आवश्यक तेथे योग्य पालन करावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.