मुंबई - लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर रविवारी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सोमवारी काँग्रेसच्या भारतीय युवक काँग्रेसने मुंबईतील प्रदेश युवकच्या महासचिव, सचिवांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक युवतींवर भर देत तब्बल १६ युवतींची मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यासोबतच महासचिवपदीही युवतीची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मुंबई प्रदेश युवक काँग्रेसमध्ये 'युवती राज' अवतरणार आहे.
भारतीय युवक काँग्रेसने सोमवारी महासचिवपदी नगरसेविका निकीता निकम यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मुंबईत येत्या काळात मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेसमध्ये महिला पदाधिकारी दिसणार आहेत.
विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसने अनेक संलग्न संघटना, संस्था यांच्यात फेरबदल आणि नवीन नियुक्त्या करणे सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय युवक काँग्रेसने मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव व महासचिवांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये ८ महासचिव, १६ युवतींची सचिवपदी आणि ४ युवकांची सचिवपदी अशी एकुण २८ जणांची नियुक्ती जाहीर केली आहे.
या सर्व नवनियुक्त युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आमदार भाई जगताप यांनी ट्विट करून अभिनंदन केले. तसेच सर्वजण मिळून पुन्हा एकदा राज्यात सर्व धर्म समभाव आधारित, सर्वसमावेशक, पुरोगामी लोकाभिमुख, असे जनतेचे राज्य लवकरच स्थापन करण्यासाठी कठोर परिश्रम करू, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
-
मुंबई युवक काँग्रेसच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐
— Bhai Jagtap (@BhaiJagtap1) July 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
आपण सर्व मिळून पुन्हा एकदा राज्यात सर्वधर्मसमभाव आधारित, सर्वसमावेशक, पुरोगामी, लोकाभिमुख असे जनतेचे राज्य लवकरच राज्यात स्थापन करण्यासाठी कठोर परिश्रम करूया#जय_काँग्रेस pic.twitter.com/IRJKD6DeAp
">मुंबई युवक काँग्रेसच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐
— Bhai Jagtap (@BhaiJagtap1) July 8, 2019
आपण सर्व मिळून पुन्हा एकदा राज्यात सर्वधर्मसमभाव आधारित, सर्वसमावेशक, पुरोगामी, लोकाभिमुख असे जनतेचे राज्य लवकरच राज्यात स्थापन करण्यासाठी कठोर परिश्रम करूया#जय_काँग्रेस pic.twitter.com/IRJKD6DeApमुंबई युवक काँग्रेसच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐
— Bhai Jagtap (@BhaiJagtap1) July 8, 2019
आपण सर्व मिळून पुन्हा एकदा राज्यात सर्वधर्मसमभाव आधारित, सर्वसमावेशक, पुरोगामी, लोकाभिमुख असे जनतेचे राज्य लवकरच राज्यात स्थापन करण्यासाठी कठोर परिश्रम करूया#जय_काँग्रेस pic.twitter.com/IRJKD6DeAp