मुंबई - जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावाजवळ 1500 किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई मुंबई एनसीबीने केली. हा गांजा विशाखापट्टणम आणण्यात आला आहे. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकारणानंतर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज माफियांवर कारवाई करण्यात येत आहे. आता मुंबईप्रमाणे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील एनसीबी मोठी कारवाई करत असल्याचे दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील गावामध्ये 1500 किलो गांजा पकडला असून या प्रकरणात दोन जणांना पकडण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. विशाखापट्टनम मधून येणारा हा गांजा कुठे जात होता? या संदर्भात सखोल चौकशी पथक करत असल्याची माहिती एनसीबी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - Naxals killed in Gadchiroli : पोलीस-नक्षलवाद्यांमधील चकमकीची न्यायालयीन चौकशी व्हावी; माओवाद्यांची मागणी