मुंबई - मुंबईत मागील 24 तासात कोरोनाचे 150 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 549 झाली असून मृतांचा आकडा 100 झाला आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात कोरोनामुक्त झालेल्या 43 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत एकूण 141 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबई गेल्या 24 तासात 9 मृत्यू झाले. त्यापैकी 7 जणांना दिर्घकालीन आजार होते. तर 2 जणांचा वार्धक्याने मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या मृत्यूच्या अहवालावरून 87 टक्के मृत्यू हे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार हे दिर्घकालीन आजार तर 7 ते 8 टक्के मृत्यूंमध्ये वार्धक्याने झाल्याचे कारण समोर आले आहे.
5 ते 12 एप्रिल दरम्यान ज्या विभागात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्या विभागात इतर कोणी रुग्ण आहेत का याचा शोध घेण्यासाठी 80 क्लिनिकच्या माध्यमातून 3 हजार 85 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 1 हजार 185 संशयितांचे नमुने घेण्यात आले. आतापर्यंत 32 हजार 645 इमारती आणि सोसायट्यांमध्ये भारत सरकारच्या निर्देशानुसार निर्जंतुकीरण करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
हेही वाचा - प्रसार माध्यमातील सक्रीय पत्रकारांची कोरोना चाचणी करा - उद्योगमंत्री