मुंबई : पावसाळा नुकताच सुरू झाला आणि मुंबईत एकामागून एक दुर्घटना घडू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यातच घाटकोपर येथील रमाबाई कॉलनी नजीक असलेल्या बंगलो रोड येथे दुमजली इमारतीचा भाग खचल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू देखील झाला. ही घटना ताजी असतानाच आता चुनाभट्टी चेंबूरमधील राहुल नगर येथे रस्ता खचल्याने दुर्घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही. गेल्या आठवडाभर मुंबईत जोरदार पाऊस बरसला. आताही अधून-मधून पाऊस सुरू आहे. त्याच दरम्यान मुंबईत आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील चेंबूर चुनाभट्टी परिसरात रस्त्याचा मोठा भाग खचला आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रस्ता खचल्याने या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या गाड्या सर्व खाली खड्ड्यात कोसळल्या आहेत. या घटनेमुळे आसपास असलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्ता खचल्याने निर्माण झालेल्या खड्ड्यांमध्ये आठ ते दहा दुचाकी तर चार ते पाच चारचाकी वाहने कोसळली असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
रस्ता अचानकपणे खचला : चुनाभट्टी येथे बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास एसआरए अंतर्गत रौनक ग्रुप कन्स्ट्रक्शनकडून इमारत उभारणीसाठी खोदण्यात आलेल्या २५ फूट खोल खोदकामामुळे तेथील रस्ता अचानकपणे खचला. काही वाहने डेब्रिजमध्ये अडकली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. रस्ता खचून 8 ते 10 दुचाकी आणि 4 ते 5 कार खड्ड्यात कोसळल्या आहेत. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खबरदारीचे उपाय म्हणून आसपासच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमनदलाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. जमिनीत छिद्रासारखे दिसणरा खड्डा हा सततच्या पावसामुळे होते. सततच्या पावसामुळे नाले ओव्हरफ्लो होतात. त्यामुळे पाइपलाइनमध्ये गळती होऊ शकते. गळतीचे पाणी वाळूमध्ये मिसळते तेव्हा थर अधिक कॉम्पॅक्ट होतो. यामुळे वाळूने व्यापलेले क्षेत्र कमी होते, त्यातून रस्त्यात पोकळी तयार होते. त्यातून रस्ता खचण्याच्या घटना घडतात.
हेही वाचा :