मुंबई : २८ फेब्रुवारी पासून, भातसा येथील विद्युत स्थानकात काही तांत्रिक दोष झाल्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली आहे. पुढील आदेश येई पर्यंत ही पाणीकपात लागू राहणार आहे. पाणी कपात असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच पाण्याचा योग्य असा साठा करून ठेवावा असे आवाहन पालिकेच्या जल विभागाकडून करण्यात आले आहे.
मुंबईला रोज ३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी शेकडो लिटर पाण्याची गळती होते. यामुळे मुंबईकरांना आधीच कमी पाणी पुरवठा होतो. त्यातच उंच व डोंगरावरील भागातील नागरिकांना पाणी कमी वेळ व कमी दाबाने मिळते. आता पाणी कपात केल्याने मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी कपाटाच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
Crisis of water cut : ऐन उन्हाळ्यात मुंबईत १५ टक्के पाणी कपात - 15% water cut in Mumbai
मुंबईत गेले काही दिवस थंडी होती. मात्र सध्या गरमी वाढू लागली आहे. गरमी वाढू लागताच पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अशावेळी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) पाणी पुरावठ्यात १५ टक्के कपात (15% water cut in Mumbai ) केली आहे. यामुळे मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे