मुंबई- राज्यातील आरोग्य यंत्रणा ज्या पद्धतीने काम करीत आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत 15 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत दिली. दरम्यान, राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 124 झाली आहे. आज नव्याने मुंबईत 1 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. बुधवारी पुण्यात दोघा कोरोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.
-
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 124 झाली आहे. काल संध्याकाळी, मुंबई 1 व ठाणे 1 असे 2 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 15 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 124 झाली आहे. काल संध्याकाळी, मुंबई 1 व ठाणे 1 असे 2 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 15 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 26, 2020महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 124 झाली आहे. काल संध्याकाळी, मुंबई 1 व ठाणे 1 असे 2 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 15 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 26, 2020
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज दुसरा दिवस आहे.