ETV Bharat / state

कोरोना: मुंबईत कोरोनाच्या 15 नव्या रुग्णांची नोंद; एकूण संख्या 123 - मुंबई कोरोना न्यूज

कोरोना विषाणूचे मुंबई परिसरात गेल्या 24 तासात 15 नवे रुग्ण आढळले. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 123 झाली आहे. यात मुंबईमधील 88 तर मुंबई बाहेरील 35 रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत मुंबईमधील 5 तर मुंबई बाहेरील 2 अशा एकूण 7 जणांचा मृत्यू झाला.

Corona Virus
कोरोना विषाणू
author img

By

Published : Mar 29, 2020, 9:12 PM IST

मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे मुंबई परिसरात गेल्या 24 तासात 15 नवे रुग्ण आढळले. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 123 झाली आहे. यात मुंबईमधील 88 तर मुंबई बाहेरील 35 रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत मुंबईमधील 5 तर मुंबई बाहेरील 2 अशा एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका डॉक्टरचाही समावेश आहे.

मुंबई परिसरात मागील 24 तासात 357 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 93 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून 15 जणांच्या चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आज आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 6 पुरुष आणि 9 महिला आहेत. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

हेही वाचा - CORONA : या संकटातून जगू की वाचू..? ठाऊक नाही.. असंघटित मजुरांची गावाकडे पायपीट

या रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालय, ट्रॉमा केअर, राजावाडी रुग्णालय, केईएम रुग्णालय, पोर्ट ट्रस्ट आणि इतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 25 जानेवारीपासून 7 हजार 928 संशयित रुग्णांना तपासण्यात आले. त्यापैकी 1 हजार 828 संशयित रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.