मंत्रिमंडळ विस्तारात 'या' नेत्यांना लागणार लॉटरी तर, या दिग्गजांना मिळणार नारळ
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्धव ठाकरेंशी विस्तृत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून दिली. वाचा सविस्तर -
सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांची लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेते पदी वर्णी
मुंबई - सिंधुदुर्गचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेते पदी वर्णी लागली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संसदीय कार्यमंत्र्यांना याविषयी पत्र दिले आहे. वाचा सविस्तर -
गुजरातमध्ये हॉटेलच्या सेप्टीक टँकमध्ये ७ कामगारांचा गुदमरून मृत्यू
अहमदाबाद - गुजरातमध्ये एका हॉटेलच्या सेप्टीक टँकची सफाई करताना ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ४ जण हे सफाई कामगार होते. तर इतर तिघे हॉटेलचे कर्मचारी होते. वडोदरा जिल्ह्यातील फारतिकुई गावात ही घटना घडली. वाचा सविस्तर -
नक्षलवाद्यांकडे आढळल्या पाकिस्तानी सैन्याच्या रायफल्स
कंकेर - छत्तीसगढच्या कंकेर जिल्ह्यात नक्षल्यांकडून जप्त केलेल्या रायफल्स पाकिस्तानी सैन्याच्या असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरूद्ध एन्काउंटर मोहीम राबवण्यात आली होती. यात ४ नक्षलवादी ठार झाले आहेत. वाचा सविस्तर -
'यमराज लबाड बायकांना सेवा मुक्त कर', औरगांबादेत पत्नीपीडितांचं अनोखं आंदोलन
औरंगाबाद - महाराष्ट्रात रविवारी वटपोर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. या सणाला पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी पिंपळाच्या झाडाची पुजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करते. मात्र, औरंगाबाद येथे पत्नीपीडित पतींनी अनोखं आंदोलन छेडलं आहे. येथील वाळूज परिसरात पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पुरुषांनी पुढच्या जन्मी, अशी पत्नी नको, अशी मनोकामना यमराजाकडे केली आहे. वाचा सविस्तर -