ETV Bharat / state

'मुंबई महानगर क्षेत्रातील नऊ महापालिकांत उभारणार  १४ ऑक्सिजन प्लांट' - मुंबई महानगर प्रदेश ऑक्सिजन प्लांट बातमी

मुंबई महानगर क्षेत्रातील ऑक्सिजनची गरज आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात ३, कल्याण डोंबिवली व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रत्येकी २ तर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल येथे प्रत्येकी एक प्लांट उभारण्यास सुरूवात झाली आहे.

Minister eknath shinde
मंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Apr 25, 2021, 1:57 PM IST

मुंबई - ऑक्सिजनची वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुंंबई महानगर प्रदेशातील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या नऊ महापालिकांत १४ प्लांट उभाण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत हे प्लांट कार्यान्वित होतील, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबई महानगर क्षेत्रातील ऑक्सिजनची गरज आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात ३, कल्याण डोंबिवली व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रत्येकी २ तर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल येथे प्रत्येकी एक प्लांट उभारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी संस्थांची निवड केली असून कार्यादेशही काढला आहे. पुढील काही दिवसांमध्ये ते कार्यान्वित होतील, असे मंत्री शिंदे म्हणाले. भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून रुग्णांना पुरविणाऱ्या प्लांटची उभारणी केली जाणार आहे. एका प्लांटमधून दररोज सुमारे २ टन (९६० एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे २०० ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

सध्याच्या परिस्थितीत आणि भविष्यातही ऑक्सिजनची गरज भासल्यास या प्लांटमधून निर्माण होणारा ऑक्सिजन त्यासाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले. याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातही दिवसाला एक ते दीड टन ऑक्सिजन निर्मिती करणारे पाच ते सहा प्लांट उभारण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.