ETV Bharat / state

मुंबईतील मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळून २० जणांचा मृत्यू - rain

ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. बचाव कार्य सुरू आहे.

मुंबईतील मालाड परिसरात संरक्षक भिंत कोसळल्याने १८ जणांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 2, 2019, 7:04 AM IST

Updated : Jul 2, 2019, 7:13 PM IST

मुंबई - पश्चिम उपनगरातील मालाड येथे भिंत कोसळून २० जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुर्घटनेत मोठ्या संख्येने रहिवाशी जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Live :

मुंबईतील मालाड परिसरात संरक्षक भिंत कोसळल्याने १८ जणांचा मृत्यू; पाहा LIVE अपडेट
  • १४ तासानंतर मुलीला बाहेर काढण्यात यश
  • एनडीआरएफच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला
  • मुंबईतील अनेक भागात पाण्याची निचरा होत नसल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
  • पालिका अधिकारी रात्रभर कार्यरत
  • मृतांना प्रत्येकी ५ लाखाची मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
  • मुख्यमंत्र्यांकडून पालिकेची पाठराखण
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शताब्दी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री योगेश सागरही उपस्थित होते.
    • Mumbai: CM Devendra Fadnavis visits Shatabdi Hospital to meet the people injured in #Malad wall collapse incident today, Minister Yogesh Sagar also present. 18 people died and at least 13 were injured in the incident. #Maharashtra pic.twitter.com/IF13wzibdB

      — ANI (@ANI) July 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • अग्निशमन दलाच्या जवानांना एक महिला आणि लहान मुलगा ढिगाऱ्याखाली आढळली असून त्यांना वाचवण्याचे काम सुरू आहे.
    • Chief Fire Officer, Mumbai Fire Brigade on wall collapse in Malad East: One woman and a child have been located under debris, rescue work is in progress. #MumbaiRains

  • एनडीआरएफचे पथक श्वान पथकासह दाखल.
  • पावसाचा जोर कायम.
  • मालाड या दुर्घटनेतील जखमींना मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णलयांत भरती करण्यात आले आहे.
  • ट्रामा केअर रुग्णालय, जोगेश्वरी - ७ मृत्यू, ४ जणांची प्रकृती चिंताजनक
  • यातील १५ जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
  • शताब्दी रुग्णालय, कांदिवली - ९ मृत्यू, ५२ जखमी
  • एम डब्लू रुग्णालय, मालाड - २ मृत्यू
  • कुपर रुग्णालय, अंधेरी - २ जखमी
  • मृतांचा आकडा वाढला असून आता २० जणांचा मृत्यू, ५२ जण जखमी तर, ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
  • मुंबई आणि नवी मुंबईत सुट्टी जाहीर, शाळा, महाविद्यालयासंह शासकीय कार्यालयांना सुट्टी, मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
  • मालाड दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दु:ख व्यक्त केलं आहे. "मालाड दुर्घटनेबद्दल दु:खी आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो. तर जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो", असे ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
    • Maharashtra CM Devendra Fadnavis: Pained to know about the loss of lives in Malad Wall Collapse incidence. My thoughts are with families who lost loved ones & prayers for speedy recovery of injured. Rs 5 lakh will be given to the kin of deceased. (File pic) pic.twitter.com/31bjg4SSeP

मालाड पिंपरी पाडा येथील शिवनेरी शाळेजवळील एक सुरक्षा भिंत सोमवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू असताना कोसळली. सदर भिंत बाजूला असलेल्या घरांवर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले. या अडकलेल्या लोकांना स्थानिक नागरिकांनी तसेच अग्निशमन दलाने ढिगाऱ्याखालून काढून जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केले.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जोगेश्वरीच्या ट्रामा केअर रुग्णालायत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 15 जण उपचार घेत असून 4 जण गंभीर जखमी आहेत. दोन जणांना केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात 9 जणांचा मृत्यू झाला असून 52 जण उपचार घेत आहेत. मालाडच्या एम डब्लू देसाई रुग्णालयात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अंधेरीच्या कूपर रुग्णालयात 2 जण उपाचार घेत आहेत.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून, रस्ते वाहतुकही विस्कळीत झाली आहे. राज्य सरकारनेही सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावासमुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे.

Intro:बाईट : अग्निशमन दलाचे अधिकारी प्रभाकर उमराटकर

Body:।

Conclusion:।
Last Updated : Jul 2, 2019, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.