मुंबई - पुण्यातील नेहरू युवा केंद्राने काश्मीरमधील युवकांसाठी सहा दिवसांचा सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत काश्मीर खोऱ्यातील 125 विद्यार्थ्यांनी मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालय, गेट वे ऑफ इंडियासह मुंबईतील इतर प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली.
या विद्यार्थ्यांशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी महेश बागल यांनी खास संवाद साधला. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील दहशतग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम, श्रीनगर या सहा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मुंबईला पहिल्यांदा भेट दिली. मुंबईतील कला, संस्कृती, विज्ञान, जीवनशैली, औद्योगिकीकरणाबद्दल त्यांनी जाणून घेतले. मुंबईत झालेला विकास काश्मीरमध्येही झाला पाहिजे. यासाठी सरकारने मदत केली पाहिजे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली.
हेही वाचा - कोस्टल रोड प्रकल्पात इस्त्राइल इको फ्रेंडली विटांचा होणार वापर, समुद्री जीवांना वाचविण्यासाठी निर्णय
आम्हालाही मुख्य प्रवाहात यायचे आहे. महाराष्ट्रातील लोकांना भेटल्यानंतर समजले की, आपला फक्त प्रदेश वेगळा आहे विचार करण्याची पद्धत, भाव-भावना सारख्याच आहेत. येथील लोकांनी प्रेमाने वागणूक दिली. मुंबईमधील शिक्षणाच्या सोयी-सुविधा काश्मीरमधील मुलांना मिळाल्या तर आमचीही प्रगती होईल, अशा भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.