महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बसला मध्यप्रदेशात अपघात, ३ जणांचा मृत्यू
भोपाळ - चित्रकुट तीर्थस्थळाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंची बस पलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. हा अपघात विदिशा जिल्ह्यातील धतुरिया गावाजवळ घडला आहे. या अपघातात सात यात्रेकरू जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर -
नृपेंद्र मिश्रांची पंतप्रधानांच्या मुख्य सचिवपदी पुनर्नियुक्ती, कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव म्हणून नृपेंद्र मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. मिश्रा हे मोदींच्या आधीच्या कार्यकाळातही मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. यावेळी पुन्हा त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांनी वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर पी. के. मिश्रा यांची पंतप्रधानांच्या अतिरिक्त सचिवपदी निवड करण्यात आली आहे. वाचा सविस्तर -
नीरव मोदीच्या जामिन अर्जावर लंडन न्यायालय आज देणार निकाल
लंडन - पंजाब नॅशनल बँकेची सुमारे २०० अब्ज कोटींची फसवणूक आणि मनीलाँड्रिग गुन्ह्यातील फरार आरोपी नीरव मोदीच्या अर्जावर आज लंडन न्यायालय निकाल देणार आहे. याबाबतचा निकाल सकाळी दहा वाजता येणार आहे. वाचा सविस्तर -
छत्तीसगड : सरकारी कर्मचाऱ्यांनी 'अशी' कपडे घालू नयेत, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
छत्तीसगड - सरकारी कर्मचाऱ्यांना नियमांचे उल्लंघन होवू नये, याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा प्रशासकीय कठोर कारवाई होण्याची भीती असते. मात्र छत्तीसगडमधील विजापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाने कर्मचाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. येथील जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना टी-शर्ट, जीन्स आणि भडक रंगाचे कपडे वापरण्यास मनाई केली आहे. वाचा सविस्तर -
बुलडाणा : खामगावात वेल्डिंग करताना बॉयलरचा स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू
बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव येथील दुर्गाशक्ती ऑईल मिलमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. शेख मुशीर शेख हनिफ ( 30), शेख इसराल शेख अब्रार (28 ) अशी मृत कामगारांची नावे आहेत. मिल मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. वाचा सविस्तर -