एल्गार परिषद प्रकरण : रांचीतील फादर स्टेन स्वामीच्या घरावर पुणे पोलिसांचा छापा, इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त
पुणे - येथे 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेसंदर्भात फादर स्टेन स्वामींच्या रांचीतील घरावर छापा टाकण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त करण्यात आले आहे. वाचा सविस्तर -
दोन ट्रकच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी
यवतमाळ - जिल्ह्यातील कळंब येथील पंचायत समितीसमोर नादुरुस्त ट्रकला नागपुरकडे जाणाऱ्या ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वाचा सविस्तर -
जहाल नक्षली नर्मदाक्काचे पतीसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण?
गडचिरोली - जिल्ह्यातील नक्षल चळवळीत प्रमुख असलेली जहाल नक्षली नर्मदाक्का हिने तिचा पती किरणकुमार ऊर्फ किरण दादा याच्यासह गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसर्मपण केले आहे. मात्र, ही अटक आहे की आत्मसर्मपण याबद्दल अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. वाचा सविस्तर -
'वायू' वादळामुळे चिनच्या दहा बोटी भारताच्या आश्रयाला
रत्नागिरी - वायू चक्रीवादळाचा फटका चीनच्या बोटींनाही बसण्याची शक्यात असल्याने चिनच्या दहा बोटी सुरक्षेसाठी भारताच्या आश्रयाला आल्याची माहिती आहे. रत्नागिरीतल्या दाभोळ समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर आतमध्ये या बोटी आहेत. बोटींची तपासणी झाल्यावर बोटींना दाभोळ समुद्रात आणण्यात येणार आहे. वाचा सविस्तर -
पुणे : दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रेयसीची हत्या, प्रियकर फरार
पुणे - प्रेयसीचे दुसऱ्याच तरुणाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराने तिची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर प्रियकर फरार झाला आहे. ही घटना पुण्याच्या चंदननगर परिसरात मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. मीना पटेल (वय २२), असे मृत तरुणीचे नाव आहे. तर खून करून फरार झालेल्या प्रियकरचे नाव किरण अशोक शिंदे (वय २५) असे आहे. वाचा सविस्तर -