औरंगाबाद महापालिकेत गोंधळ; भाजप-एमआयएम नगरसेवकांनी पळवला राजदंड, ६ नगरसेवक निलंबित
औरंगाबाद - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. दोन्ही नगरसेवकांनी आपआपल्या मागण्यांसाठी राजदंड पळवला. यावरून महापौरांनी एमआयएमच्या ६ नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबीत केले आहे. वाचा सविस्तर -
धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्यासंबंधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
नवी दिल्ली - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बीडमधील अनधीकृत भूखंड खरेदी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने सुणावनी करण्यास मान्यता दिली आहे. उद्या या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात धनंजय मुंडेनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. वाचा सविस्तर -
गुजरातचा धोका टळला, 'वायू'ने दिशा बदलली
अहमदाबाद - गुजरातच्या उंबरठ्यावर संकट बनून उभे राहिलेले "वायू" चक्रीवादळ आता गुजरातला धडकणार नसल्याची माहिती भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. आता हे चक्रीवादळ गुजरात राज्याला न धडकात वेरावल, पोरबंदर आणि द्वारका किनाऱ्याजवळील समुद्रातूनच पुढे जाईल. वाचा सविस्तर -
IND VS NZ : न्यूझीलंडची विजयी घौडदौड रोखण्याचे विराटसेनेसमोर आव्हान, अशी आहे दोन्ही संघाची स्थिती
नॉटिंगहॅम - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. हा सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर गुरुवारी दुपारी ३ वाजता खेळण्यात येणार आहे. या स्पर्धेत हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित राहिले आहेत. या स्पर्धेत न्यूझीलंडने ३ सामने खेळले असून या तीन्ही सामन्यात त्यांनी विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर भारतीय संघ २ विजयासह ४ गुण मिळवून चौथ्या स्थानी आहे. वाचा सविस्तर -
बहुप्रतीक्षित 'साहो'चा टिझर अखेर रिलीज, चक्रावून गेले प्रेक्षक
मुंबई - बाहुबली चित्रपटाचा नायक प्रभासच्या 'साहो' चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूपच ताणली आहे. बराच काळ प्रभास सध्या काय करतोय, अशी चर्चा होती. भरपूर अॅक्शन आणि थ्रिल या चित्रपटात असेल याची ग्वाही बातम्यांमधून मिळत होती. अखेर चित्रपटाच्या टिझरने यावर शिक्कामोर्तब केले आहे. वाचा सविस्तर -