ETV Bharat / state

मुंबईत वर्षभरात धावणार डझनभर एसी लोकल, महिलांच्या सुरक्षेसाठी असणार 'ही' खास व्यवस्था - 12 एसी

मुंबईकर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व थंड व्हावा, यासाठी येत्या वर्षभरात १२ एसी लोकल मध्य व पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार; महिलांच्या सुरक्षेसाठीही खास व्यवस्था
author img

By

Published : Jun 5, 2019, 5:11 PM IST

Updated : Jun 5, 2019, 7:45 PM IST

मुंबई - मुंबईकर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व थंड व्हावा, यासाठी येत्या वर्षभरात १२ एसी लोकल मध्य व पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामध्ये मध्यसाठी ६ आणि पश्चिम रेल्वेसाठी ६ अशा १२ लोकल दाखल होणार आहेत, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी दिली.

मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार; महिलांच्या सुरक्षेसाठीही खास व्यवस्था

जून २०१९ पासून दर महिन्याला १ एसी लोकल मुंबईत दाखल होईल. यातील ३ एसी लोकल या मेधा बनावटीच्या तर ५ एसी लोकल भेल बनावटीच्या असतील. या एसी लोकल विरारच्या पुढे डहाणूपर्यंत चालविण्यात येतील, असे अग्रवाल यांनी सांगितले.

रेल्वेत महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने १३३ एमयू रॅकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर आतापर्यंत १८ महिलांच्या डब्यात टॉक बॅक प्रणाली बसवण्यात आली आहे. तसेच लवकरच सर्व डब्यात टॉक बॅक प्रणाली बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच ती पार पडेल, असे अग्रवाल यांनी सांगितले.

Intro:मुंबईकर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व गारेगार व्हावा यासाठी येत्या वर्षभरात 12 एसी लोकल दाखल होणार आहेत. प्रत्येकी 6 एसी लोकल मध्य व पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील अशी माहिती रेल्वे बोर्डाचे स्टाँक सदस्य राजेश अग्रवाल यांनी मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली.

Body:जून 2019 पासून प्रत्येक1 एसी लोकल दर महिन्याला मुंबईत दाखल होईल. यातील 3 एसी लोकल या मेधा बनावटीच्या तर 5 एसी लोकल भेल बनावटीच्या असतील. या एसी लोकल विरारच्या पुढे डहाणूपर्यंत चालविण्यात येतील असे अग्रवाल यांनी म्हटले.
मुंबईत पहिल्यांदाच विरार कारशेडमध्ये ईएमयु सिम्युलेटर लावण्यात आले आहे. यासाठी मोटरमनना प्रशिक्षण देण्यात येत असून 2018- 19 मध्ये 152 मोटारमनना ईएमयु सिम्युलेटरचे
प्रशिक्षण दिले गेले.

Conclusion:महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 133 एमयू रॅकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. आतापर्यंत 18 महिलांच्या डब्यात टॉक बॅक प्रणाली बसविण्यात आली असून लवकरच सर्व डब्यात बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच ती पार पडेल असे अग्रवाल यांनी सांगितले.
Last Updated : Jun 5, 2019, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.