मुंबई - येथे शुक्रवारी कोरोनाचे नवे 1150 रुग्ण आढळून आले आहेत. तर 53 जणांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 45854 वर तर मृतांचा आकडा 1518 वर पोहचला आहे.
मुंबईमधून आतापार्यंत 18797 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 25539 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्यात शुक्रवारी काही प्रमाणात घट दिसून आली. मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नव्याने 1150 रुग्ण आढळून आले. तर 53 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 47 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 28 पुरुष आणि 25 महिला रुग्ण होत्या.
मृतांमध्ये 2 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 32 जणांचे वय 60 वर्षावर तर 19 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 699 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 18797 वर पोहचला आहे.