ETV Bharat / state

Corona Update In Maharashtra: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी हजारावर रुग्ण, तिघांचा मृत्यू - Corona Update Dated 20 April

राज्यात १२ ते १४ एप्रिल दरम्यान तीन दिवस १ हजारावर रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर काल १९ एप्रिल रोजी १ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी एक हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. आज १११३ नव्या रुग्णांची तर ३ मृत्यूंची नोंद करण्यात आली. तसेच १०८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ६१०२ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी २९५ रुग्ण रुग्णालयात दाखल असून ४९ रुग्ण आयसीयुमध्ये दाखल आहेत.

Corona Update In Maharashtra
कोरोना रुग्ण
author img

By

Published : Apr 20, 2023, 10:43 PM IST

मुंबई: राज्यात आज १११३ रुग्णांची नोंद झाली आहे. ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून १०८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ८१ लाख ५९ हजार ५०६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८० लाख ४ हजार ८८५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १ लाख ४८ हजार ४९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज १७,१३१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १४,१८१ चाचण्या सरकारी प्रयोगशाळेत, २६८९ चाचण्या खासगी प्रयोगशाळेत तर २६१ चाचण्या 'सेल्फ टेस्ट' करण्यात आल्या आहेत. राज्यात XBB 1.16 व्हेरियंटचे ६८१ रुग्ण आढळून आले असून ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

साडेतीन महिन्यात ७५ मृत्यू: १ जानेवारीपासून आजपर्यंत गेल्या साडेतीन महिन्यात कोरोनामुळे ७५ मृत्यू झाले असून त्यामधील ६० वर्षांवरील नागरिकांचे ७३.३३ टक्के मृत्यू झाले आहेत. इतर आजार असलेल्या नागरिकांचे ७१ टक्के मृत्यू झाले आहेत. ९ टक्के मृत्यू सहबाधित नसलेल्या नागरिकांचे झाले आहेत तर २० टक्के मृत्यू हे कशामुळे झाले याची माहिती नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

४६ रुग्ण गंभीर: राज्यात १९ एप्रिल रोजी ६१०२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ५८०७ म्हणजेच ९५.२ टक्के रुग्ण गृह विलागिकरणात आहेत. २९५ टक्के ४.८ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. २४६ म्हणजेच ४ टक्के रुग्ण सर्वसाधारण वार्डमध्ये उपचार घेत आहेत तर ४९ म्हणजेच ०.८ टक्के रुग्णांवर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत.

'या' दिवशी सर्वाधिक रुग्णांची नोंद:
१२ एप्रिल ११२५
१३ एप्रिल १०८६
१४ एप्रिल ११५२
१९ एप्रिल ११००
२० एप्रिल १११३

शासन अलर्ट मोडवर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक भर पडत आहे. सध्या 6086 इतके सक्रिय रुग्ण आहेत. वाढत्या रुग्णसंखेच्या पार्श्वभूमीवर पूर्वानुभव लक्षात घेता, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन, महापालिका आणि आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. कोविड प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जात आहेत. वयोवृद्ध, विविध व्याधी असलेल्यांना मास्क लावणे बंधनकारक केले आहे. दुसरीकडे लसीकरणावर भर दिला आहे. लसींची कमतरता होऊ नये, यासाठी राज्य सरकारने हैदराबाद येथील भारत बायोटेककडून सुमारे दोन लाख लसींच्या कुपी खरेदी करणार आहे.

2 लाख कुपी घेणार : मागील दोन वर्ष कोरोनाने नागरिकांना बंदिस्त केले होते. उद्योग धंदे, व्यापार, रोजगार, शिक्षण बंद होते. दरम्यान, कोविडवर मात करण्यासाठी सरकारने कोविड लसींचे डोस देण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आतापर्यंत मिळालेल्या लसींमध्ये एकूण 1,899,78,562 लोकांनी लसीचा डोस घेतला आहे. पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची आकडेवारी देखील लक्षणीय आहे. आता पुन्हा एकदा राज्य सरकार परराज्यातून 2 लाख कोविड लस आयात करणार आहे. प्रतीलसींची किंमत 342 रुपये इतकी असून दोन लाख लसींसाठी सरकारला 6 कोटी 82 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारने यासाठी नियमावली दिली आहे. सध्या बायोटेकसोबत बोलणी झाली आहे. लवकरच ते खरेदी करण्यात येणार असल्याचे समजते.

हेही वाचा: Raj Thackeray Met CM Shinde : राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन, सिडको संदर्भात चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.