ETV Bharat / state

Containment Zones Mumbai : मुंबईतील झोपडपट्टीत पुन्हा कोरोनाचा प्रसार, ११ झोपडपट्ट्या सील - Mumbai corona omicron variant

गेल्या चार महिन्यांत कंटेनमेंट झोनमुक्त असलेल्या झोपडपट्ट्यां कंटेनमेंट झोन जाहीर करून सील करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत तब्बल ११ झोपडपट्ट्या सील करण्यात आल्या आहेत. ( 11 Slums Sealed in Mumbai Over Omicron Variant Mumbai )

11 slums sealed in mumbai over omicron variant mumbai
मुंबईतील झोपडपट्टीत पुन्हा कोरोनाचा प्रसार, ११ झोपडपट्ट्या सील
author img

By

Published : Jan 2, 2022, 12:05 AM IST

Updated : Jan 2, 2022, 12:26 AM IST

मुंबई - डिसेंबरपासून मुंबईत कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरिएंट बाधितांची संख्या वाढते आहे. विशेष करून इमारतींमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता झोपडपट्टयांतही कोरोना पसरतो आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांत कंटेनमेंट झोनमुक्त असलेल्या झोपडपट्ट्यां कंटेनमेंट झोन जाहीर करून सील करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत तब्बल ११ झोपडपट्ट्या सील करण्यात आल्या आहेत. ( 11 Slums Sealed in Mumbai Over Omicron Variant Mumbai )

झोपडपट्ट्यांमध्ये ११ कंटेनमेंट झोन -

मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना आता पुन्हा एकदा वेगाने वाढतो आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला १००पर्यंत कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आता ही संख्या रोज सहा हजारांवर गेली आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येने मुंबईची चिंता वाढवली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या संख्येने वाढणारे भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. यामध्ये दोन रुग्ण आढळल्यास इमारतीचा मजला, तर पाच रुग्ण आढळल्यास पूर्ण इमारत सील केले जात आहे. तर झोपडपट्टीमध्ये पाच ते दहा रुग्ण आढळल्यास संबंधित भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला जातो आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कुर्ल्यामध्ये ७, ग्रँट रोड-गिरगाव परिसर ३ आणि वरळी विभागात १ असे ११ कंटेनमेंट झोन पालिकेकडून जाहिर करण्यात आला आहे.

‘डी’ वॉर्डमध्ये झोपडपट्टीत पहिला कंटेनमेंट झोन -

ऑगस्टच्या मध्यावर झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आल्यामुळे झोपडपट्ट्या पूर्ण कंटेनमेंटमुक्त झाल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना वाढतो आहे. ‘डी’ वॉर्डमध्ये झोपडपट्टीत पहिला कंटेनमेंट झोन जाहीर झाला. त्यानंतर गेल्या दोनच दिवसांत कंटेनमेंट झोनची संख्या २ वरून ११ वर पोहोचली आहे.

हेही वाचा - Maharashtra Corona update - राज्यात गेल्या 24 तासांत 9 हजार 170 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 7 रुग्णांचा मृत्यू

१२८ इमारती, ३०२० मजले सील -

मुंबईत सद्यस्थितीत झोपडपट्टीतील २४ हजार घरांतील १ लाख २३ हजार रहिवासी कंटेनमेंट झोनमध्ये आहेत. १२८ सील इमारतीमधील १८ हजार घरांमधील ६८ हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत. ३०२० सील मजल्यांमधील १ लाख ३९ हजार घरांमधील ५ लाख १३ हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत. त्यामुळे मुंबईतील तब्बल सात लाखांहून अधिक रहिवासी निर्बंधांच्या कचाट्यात अडकले आहेत.

काय आहे कंटेनमेंट झोन -

ज्या झोपडपट्ट्या किंवा चाळींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येतात त्या सील केल्या जातात. अशा झोपडपट्ट्या किंवा चाळींमधील रहिवाशांना घराबाहेर, विभागाच्या बाहेर जाण्यास बंदी असते. येथील रहिवाशांना अत्यावश्यक सेवा आणि गरजा स्थानिक प्रशासनाकडून पुरवले जाते. असे केल्याने येथील पॉजिटिव्ह रुग्ण इतर लोकांच्या संपर्कात येत नाहीत. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखता येतो.

Last Updated : Jan 2, 2022, 12:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.