ETV Bharat / state

आज..आत्ता... मंगळवार सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर - ACCIDETN

नगर - पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे...'वायू' चक्रीवादळाचा विदर्भ मराठवाड्यावर परिणाम होणार असून त्यामुळे मान्सून दाखल होण्यास उशीर होणार आहे... नाशकात गस्त पथकावर गुन्हेगारांच्या टोळक्यानी प्राणघातक हल्ला केला असून यात 1 पोलीस गंभीर आहे....पनवेलमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे....वर्ध्यात बंद आश्रमशाळेत अनधिकृतरित्या ठेवलेल्या चौकीदाराचा मृत्यू झाला असून कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले आहेत....

आज....आत्ता....
author img

By

Published : Jun 11, 2019, 9:00 AM IST

नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; ३ जणांवर काळाचा घाला

अहमदनगर - नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ भरधाव स्कॉर्पिओने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये ३ जण जागीच ठार झाले, तर १ जण जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वाचा सविस्तर -

'वायू' चक्रीवादळाचा विदर्भ मराठवाड्यावर परिणाम, मान्सून दाखल होण्यास होणार उशीर

सांगली - मान्सूनच्या आगमानाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना चिंता वाढविणारा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'वायू' चक्री वादळाचा राज्यातील मान्सूनवर परिणाम होणार आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठावाडयातील मान्सून लांबणीवर जाणार असल्याचा अंदाज पर्यावरण आणि हवामान अभ्यासक राहुल पाटील यांनी व्यक्त केला. या कालावधीत तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर -

नाशिकमध्ये पोलीसच असुरक्षित; गस्त पथकावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला, 1 गंभीर

नाशिक - गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सागर हजारी असे हल्ल्यातील जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली आहे. वाचा सविस्तर -

विजांच्या कडकडाटासह पनवेलमध्ये जोरदार पाऊस; नागरिकांना दिलासा

पनवेल - विजांच्या कडकडाटसह पनवेलमध्ये सोमवारी जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या पनवेलकरांना दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर -

बंद आश्रमशाळेत अनधिकृतरित्या ठेवलेल्या चौकीदाराचा मृत्यू ; कुत्र्यांनी तोडले मृतदेहाचे लचके

वर्धा - जिल्ह्यातील पांजारा बोथली येथील बंद असलेल्या सरकारी आश्रमशाळेत चौकीदाराचा मृतदेह आढळून आला. दुर्गंधी पसरल्याने गुराख्याने जाऊन पाहिले असता सोमवारी दुपारी ही उघडकीस आली. कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडल्याचेसुद्धा आढळून आले. यशवंत महाजन (७५) असे मृताचे नाव आहे. त्यांना अनधिकृतपणे चौकीदार म्हणून ठेवण्यात आल्याचेही समोर आले आहे. वाचा सविस्तर -

बातमी, सर्वांच्या आधी....

Intro:Body:

AKSHAY - BULLETIN 9 AM

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.