शुक्रवारी होणार मंत्रीमंडळ विस्तार; मुख्यमंत्र्यांसोबत विखे-पाटील, मोहिते-पाटील, सत्तारांची चर्चा
मुंबई - पावसाळा अधिवेशनाच्या आधी राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात भाजपच्या वाटेवर असलेले विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर यांची बैठक झाली. या आठवड्यातच या नेत्यांचा भाजप प्रवेश आणि १४ जूनला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. वाचा सविस्तर
मुख्यमंत्री कोणाचा होणार? यासाठी अमित शाहंकडे लक्ष द्या, मुनगंटीवारांचा सेनेला सूचक इशारा
मुंबई - शिवसेना आणि भाजपचा तिढा वाढतच चालला असून शिवसेना अस्वस्थ असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. मुनगंटीवार यांनी सोमवारी नाशिकमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले होते. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक हर्षल प्रधान यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. मुनगंटीवार यांच्याकडे लक्ष देऊ नये, मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शहा घेतील, असे म्हटले आहे. वाचा सविस्तर
गुहागरमध्ये अल्पवयीन मुलीवर तिघांचा बलात्कार; परिसरात खळबळ
रत्नागिरी - माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगत एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी बलात्कार केला. ही धक्कादायक घटना रत्नागिरीतील गुहागरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
दहावीच्या परीक्षेत 'रिद्दी-सिद्दी'ने घडवला चमत्कार; जुळ्या बहिणींना मिळाले 'सेम टू सेम' गुण
ठाणे - दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये कुणी सर्वच विषयात 35 मार्क घेतले तर कुणी 100 टक्के मिळवले. परंतु, अंबरनाथ तालुक्यातील रिद्दी व सिद्दीने या निकालात एक आगळावेगळा चमत्कारच घडवला. या दोघी जुळ्या बहिणींनी चक्क सेम टू सेम गुणांची कमाई करुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. वाचा सविस्तर
कठुआ निकालानंतर घृणास्पद कृत्य करणाऱ्यांबद्दल हे आहे जावेद अख्तर यांचे मत
मुंबई - कठुआ लैंगिक अत्याचार आणि बालिकेचा खुन प्रकरणात तिघा जणांना जन्मठेपेची शिक्षा सोमवारी ठोठावण्यात आली. पठाणकोट न्यायालयाने हा निकाल दिला. त्यानंतर दोषींना फाशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. वाचा सविस्तर