ETV Bharat / state

आज..आत्ता... मंगळवार दुपारी 3 पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर - BHARAT

घरासमोर खेळताना २ वर्षाचा फतेहवीर १५० फुट खोल बोअरमध्ये पडला होता. त्यात 109 तासांची झुंज अपयशी ठरत त्याचा मृत्यू झाला आहे....शिखर धवन तीन आठवड्यांसाठी विश्वकरंडकातून बाहेर पडला आहे. त्यामुळे हा भारतासाठी मोठा धक्का आहे....मुनगंटीवार औरंगाबादेत म्हणाले; लोकसभेत काही वाघ घायाळ झाले, ते भाजपच्या बंदुकीने नाही...जालन्यात हंडाभर पाण्यासाठी शाळकरी मुलगी विहिरीत पडून गंभीर जखमी झाली आहे....तर दुसरीकडे कोकण रेल्वेच्या वेगाला ब्रेक! लागल्याचे पहायला मिळत आहे. तसेच नवीन पावसाळी वेळापत्रकी जाहीर झाले आहे.

आज...आत्ता....
author img

By

Published : Jun 11, 2019, 2:59 PM IST

१०९ तासांची झुंज ठरली अपयशी; २ वर्षाचा 'फतेहवीर' अखेर हरला!

संगरूर - पंजाबमधील संगरूर येथे घरासमोर खेळताना २ वर्षाचा फतेहवीर १५० फुट खोल बोअरमध्ये पडला होता. जवळपास १०९ तास एनडीआरफच्या दलाने बचावकार्य राबवत त्याला बोअरवेलमधून बाहेर काढले. मात्र, फतेहवीरला चंदीगढमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. वाचा सविस्तर -

भारताला मोठा धक्का, शिखर धवन तीन आठवड्यांसाठी विश्वकरंडकातून बाहेर

लंडन - विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तब्बल तीन आठवड्यांसाठी भारतीय संघातून बाहेर पडला आहे. वाचा सविस्तर -

मुनगंटीवार औरंगाबादेत म्हणाले; लोकसभेत काही वाघ घायाळ झाले, ते भाजपच्या बंदुकीने नाही...

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत काही वाघ घायाळ झाले आहेत. मात्र, योग्य वेळी त्यांच्या जखमा बऱ्या केल्या जातील, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता केले आहे. ते शहरातील वाल्मी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर -

हंडाभर पाणी बेतले जीवावर; जालन्यात शाळकरी मुलगी विहिरीत पडून गंभीर जखमी

जालना - डुकरी पिंपरी गावातील एक ११ वर्षीय मुलगी विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेली असता तोल जाऊन विहिरीत पडली. त्यामुळे या मुलीच्या दोन्ही पायांची हाडे मोडली आहेत. गायत्री रंगनाथ उगले, असे या शाळकरी मुलीचे नाव आहे. वाचा सविस्तर -

कोकण रेल्वेच्या वेगाला ब्रेक! नवीन पावसाळी वेळापत्रक जाहीर

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग सोमवारपासून मंदावला. कारण कोकण रेल्वेने नवीन पावसाळी वेळापत्रक जाहीर केले असून ते आजपासून लागू करण्यात आले आहे. वाचा सविस्तर -

बातमी, सर्वांच्या आधी...

Intro:Body:

Akshay - bulletin 3 PM

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.