मुंबई - आज (मंगळवार) पासून राज्यात दहावीच्या परीक्षेचा सुरुवात झाली. पहिल्या भाषेच्या पेपरला विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा केंद्रांवर सकाळी 10 वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
मुंबई विभागात 1 हजार 24 मुख्य परीक्षा केंद्रे असून एकूण 3 हजार 785 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहेत. विभागातून 3 लाख 91 हजार 991 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून यात 2 लाख12 हजार 524 विद्यार्थी आणि 1 लाख 79 हजार 447 विद्यार्थिनींचा समावेश आहे, 2 हजार 759 दिव्यांग आणि 20 तृतीयपंथीही यावर्षी दहावीची परीक्षा देणार आहेत.
हेही वाचा - अलिबागची शर्विका म्हात्रे ठरली भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
विद्यार्थ्यांच्या मनात पहिल्या पेपरचे दडपण आणि काहीशी भीती दिसून आली. कोणतेही भीती आणि दडपण निर्माण होऊ नये, यासाठी पालक केंद्रावर आले आहेत. चांगल्या प्रकारे आजचा पेपर सोडवू, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.