ETV Bharat / state

"10 हजार मुंबईकरांना कोरोना होऊन गेला, मात्र त्यांना माहितीच नाही"

मुंबईत सध्या कोरोनाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचा प्रसार झाला आहे का याची माहिती मिळवण्यासाठी पालिकेने टाटा इस्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च यांच्यासोबत काही भागात सेरो सर्वेक्षण करत 10 हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्याचे काम सुरू केले आहे.

Corona test
"10 मुंबईकरांना कोरोना होऊन गेला, मात्र त्यांना माहितीच नाही"
author img

By

Published : Jul 23, 2020, 7:21 AM IST

Updated : Jul 23, 2020, 7:08 PM IST

मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची 10 हजार मुंबईकरांना लागण झाली ते त्यामधून बरेही झाले. मात्र, त्यांना कोरोना होऊन गेल्याची माहितीच नसल्याची धक्कादायक बाब थायरोकेयर लॅबने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आल्याची माहिती मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. आरोक्या स्वामी वेलुमानी यांनी दिली. देशभरात 18 कोटी लोकांना कोरोना होऊन गेला असल्याची शक्यताही वेलुमानी यांनी वर्तवली आहे.

मुंबईत सध्या कोरोनाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचा प्रसार झाला आहे का याची माहिती मिळवण्यासाठी पालिकेने टाटा इस्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च यांच्यासोबत काही भागात सेरो सर्वेक्षण करत 10 हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्याचे काम सुरू केले आहे. त्याचा अहवाल अजून येणे बाकी आहे. असे असताना थायरोकेअर या खासगी लॅबने सेरो सर्वेक्षण करून 10 हजार मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली होती, ते त्यामधून चांगलेही झाले. मात्र, त्यांना त्याची माहिती पडली नाही, असे या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे.

थायरोकेअरने केलेल्या अँटीबॉडी चाचण्यांमध्ये वरळीत 32.15 टक्के, घाटकोपरला 36.7 टक्के, सांताक्रुजमध्ये 31.45 टक्के तर बांद्रा पश्चिमेला 17 टक्के मुंबईकरांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. थायरोकेअर लॅबचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. वेलुमानी यांनी देशभरात 18 कोटी लोकांना कोरोना होऊन गेला असल्याची शक्यता वर्तवली आहे. थायरोकेयरने भारतातील सहाशे ठिकाणाहून 60 हजाराहून अधिक नमुने तपासले आहेत. यामधून 15 टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे. त्यातून ते आपोआप बरेही झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.

"10 हजार मुंबईकरांना कोरोना होऊन गेला, मात्र त्यांना माहितीच नाही"

आयसीएमआरच्या परवानगीनंतर सरकारी प्रयोगशाळा बरोबरच खासगी प्रयोगशाळांनी एका महिन्यात केलेल्या निरीक्षणातील हा अहवाल असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी थायरोकेअर लॅब रिपोर्टच्या आधारे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून एक लाख लोकांची तपासणी करण्याची मागणी केली आहे.

पालिकेचा अहवाल येणे बाकी -

मुंबई महापालिका आणि टाटा इस्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च यांच्यासोबत मुंबईतील काही भागात सेरो सर्वेक्षणाच्या माध्यमातून 10 हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी कस्तुरबा मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅब आणि ट्रान्सलेशन हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट फरिदाबादला पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अजून येणे बाकी आहे.

सेरो सर्वेक्षण -

आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रक्ताचे नमुने घेतल्यानंतर रक्तातील अ‌ॅन्टीबाॅडीजची तपासणी करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामुळे कोरोनाची लागण होणे, कोरोनाचा फैलाव लोकांमध्ये कशा प्रकारे झाला याबाबत माहिती उपलब्ध होणार असून सार्वजनिक आरोग्याच्या धोरणात्मक निर्णयासाठी महत्त्व पूर्ण ठरणार असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Last Updated : Jul 23, 2020, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.