ETV Bharat / state

Mumbai News: गोवरमुळे मुंबईत दुसरा मृत्यू; कस्तुरबा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या 1 वर्षाच्या बाळाचा मृत्यू

author img

By

Published : Nov 15, 2022, 9:55 AM IST

Mumbai News: एका बाळाला ताप होता. तसेच त्याला फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग झाल्याने त्याला शुक्रवारी मुंबई पालिकेच्या चिंचपोकळी सातरस्ता येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारी दुपारी त्याला लाइफ सपोर्टवर (व्हेंटिलेटरवर) ठेवण्यात आले. सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुलाचा मृत्यू झाला.

Mumbai News
Mumbai News

मुंबई: मुंबईमधील काही विभागात गोवरचा प्रसार झाला आहे. मागील महिन्यात गोवरमुळे एका मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता पायधूनी नळ बाजार येथील १ वर्षाच्या मुलाचा मृत्यू कस्तुरबा रुग्णालयात झाला आहे. काल सोमवारी या बालकाचा मृत्यू झाला आहे. हा मुलगा दोन दिवस ताप आणि फुफ्फुसाचा आजार झाल्याने व्हेंटिलेटरवर होता. गोवरमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

बालकाचा मृत्यू: एका बाळाला ताप होता. तसेच त्याला फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग झाल्याने त्याला शुक्रवारी मुंबई पालिकेच्या चिंचपोकळी सातरस्ता येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारी दुपारी त्याला लाइफ सपोर्टवर (व्हेंटिलेटरवर) ठेवण्यात आले. सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुलाचा मृत्यू झाला. गोवर ब्रॉन्कोप्न्यूमोनियासह तीव्र मूत्रपिंड निकामी तसेच सेप्टिसीमिया (Cause of death -septicemia with acute renal failure with measles bronchopneumonia) मुळे या बाळाचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूने कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मृत बाळाची जुळी बहीण आहे. तिलाही गोवर झाला होता, ती सौम्य लक्षणांसह बरी झाली. त्यांना 9 महिन्यांत एकत्र लसीकरण करण्यात आले होते. त्यांना 16 महिन्यांनी दिली जाणारी दुसरी लस दिली जाणार होती. त्याआधीच या बालकाचा मृत्यू झाला आहे.

६१ रुग्ण रुग्णालयात, ६ ऑक्सीजनवर: जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे १०९ रुग्ण आढळून आले आहेत. तर ताप आणि पुरळ आलेले ७४० संशयित रुग्ण आहेत. ६१ रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ६ मुले ऑक्सीजनवर आहेत. ० ते ८ महिन्याचे ९९, ९ ते ११ महिने १०५, १ ते ४ वर्ष ४९३, ५ ते ९ वर्षे १६२, १० ते १४ वर्षे ४४, १५ आणि त्यावरील ६ असे एकूण ९०८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी कस्तुरबा रुग्णालयात ६१ रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. त्यात ० ते ८ महिन्याचे ८, ९ ते ११ महिने ५, १ ते ४ वर्ष ३१, ५ ते ९ वर्षे १४, १५ आणि त्यावरील ३ रुग्ण आहेत.

केंद्रीय पथकाने दिल्या या सूचना: केंद्रीय पथकाने राज्य शासनाच्या प्रमुख सचिवांना तसेच अतिरिक्त आयुक्त (प.उ.) यांना मुंबईतील गोवर उद्रेकाच्या सद्यपरिस्थितीबाबत माहिती देऊन सुचना दिल्या आहेत. त्यात उद्रेक असलेल्या विभागात सर्वेक्षणाव्दारे दररोज ताप व पुरळ असलेल्या नविन रूग्णांचा शोध घेणे. लक्षण आढळलेल्या रूग्णांचा दुसऱ्या दिवशी पाठपुरावा करणे. अतिरिक्त लसीकरण सत्राचे आयोजन करणे. रुग्ण दाखल करण्याची सुविधा वाढविणे. आरोग्य सेविकांना गोवर आजाराच्या गंभीर लक्षणांबाबत अवगत करणे. खाजगी डॉक्टरांना गोवर आजार व लसीकरणाविषयी अवगत करणे. लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणे अशा सूचना दिल्या आहेत. केंद्रीय पथक सदर अहवाल शासनाकडे सादर करणार आहे.

लसीकरण करून घ्या: मुंबईमधील झोपडपट्टी विभाग असलेल्या मानखुर्द गोवंडी एम ईस्ट, एम वेस्ट, जी नॉर्थ धारावी, कुर्ला एल वॉर्ड, पी नॉर्थ मालाड येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असून या याठिकाणी रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. विशेष करून गोवंडी विभागात रुग्णांची संख्या अधिक असल्याने मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येत आहे. मुंबईकरांनी लहान मुलांचे वेळीच मिसेल रुबेलावरील लस द्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

या केल्या जात आहेत उपाययोजना: आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत घरोघरी जाऊन गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत असून संशयित रुग्णांना जिवनसत्व 'अ' देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. तसेच ९ महीने व १६ महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणाचे अतिरिक्त सत्रे आयोजित करण्यात येत असून वैद्यकीय अधिकार्‍यामार्फत बालकांची तपासणी करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.