ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 1 हजार 15 नवे रुग्ण, तर 58 जणांचा मृत्यू

कोरोना रुग्णांची संख्या मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात आज काही प्रमाणात घट दिसून आली आहे. मुंबईत कोरोनाचे 1 हजार 15 नवे रूग्ण आढळले असून 58 जणांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजार 878 तर मृतांचा आकडा 1 हजार 758 वर पोहचला आहे.

Corona Positive
कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : Jun 9, 2020, 9:50 PM IST

मुंबई - राजधानीत आज कोरोनाचे 1 हजार 15 नवे रूग्ण आढळले असून 58 जणांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजार 878 तर मृतांचा आकडा 1 हजार 758 वर पोहचला आहे. मुंबईमधून आत्तापर्यंत 22 हजार 942 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 26 हजार 178 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात आज काही प्रमाणात घट दिसून आली आहे. मुंबईत आज 58 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 47 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 40 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे. मृतांमधील दोघे 40 वर्षाखाली, 30 जण 60 वर्षांवरील तर 26 जण 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 904 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 22 हजार 942 वर पोहचला आहे. मुंबईत आत्तापर्यंत 1 हजार 758 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत आत्तापर्यंत 2 लाख 33 हजार 570 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 1 ते 8 जून दरम्यान मुंबईत कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर 3 टक्के आहे. पालिकेने कोरोना रूग्ण निरीक्षणादरम्यान 18 लाख 11 हजार 766 घरांना भेटी दिल्या. ऑक्सिजनची कमी जाणवत असलेल्या 3 लाख 12 हजार 778 जेष्ठ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 1 हजार 834 जेष्ठ नागरिकांवर उपचार केले जात आहेत.

कोरोना रूग्ण आढळलेल्या झोपडपट्टी आणि चाळींमध्ये 775 कंटेन्मेंट झोन असून 4 हजार 71 इमारती सिल करण्यात आलेल्या आहेत. गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या 8 हजार 494 जणांचा शोध घेण्यात आला आहे. सध्या कोरोना केअर सेंटरमध्ये अति जोखमीचे 27 हजार 708 जण भरती असून आत्तापर्यंत एकूण 97 हजार 74 जणांना भरती करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.