ETV Bharat / state

चांदीवलीत बेस्ट बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांवर संरक्षक भिंत कोसळली; १ ठार, २ जखमी

चांदीवलीत संरक्षक भिंत कोसळून एका प्रवाशाचा मृत्यू, तर २ जण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चांदीवलीत बेस्ट बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांवर संरक्षक भिंत कोसळली; १ ठार, २ जखमी
author img

By

Published : Aug 2, 2019, 5:19 PM IST

मुंबई - चांदीवली येथे बेस्ट बसची वाट पाहत असणाऱ्या प्रवाशांवर बंद घराची संरक्षक भिंत कोसळली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर २ जण जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

चांदीवलीत बेस्ट बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांवर संरक्षक भिंत कोसळली; १ ठार, २ जखमी

चंद्रकांत मोनाप्पा शेट्टी (वय ४२ वर्ष) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. चांदीवली येथील म्हाडा कॉलनी १ मध्ये काही स्थानिक प्रवाशी बेस्ट बसची वाट पाहत उभे होते. यावेळी बाजूच्या झाडाची फांदी घराच्या संरक्षक भिंतीवर कोसळली. त्यामुळे जीर्ण झालेली भिंत प्रवाशांच्या अंगावर कोसळली. माहिती मिळताच अग्मिशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या २ प्रवाशांना बाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच चंद्रकांत यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेला आहे.

भिंत कोसळलेल्या घरातील लोक काही दिवसांपूर्वीच दुसरीकडे राहायला गेले आहेत. हे बंद घर पाडण्याची जबाबदारी विकासकाची होती. मात्र, विकासकाने घर पाडले नसल्याने आज एकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Intro:चांदीवलीत घराची भिंत कोसळून एका पादचाऱ्याचा मृत्यू 2 जखमी

मुंबई चांदीवली मध्ये बेस्ट बसची वाट पाहत थांबलेल्या पादचाऱ्यावर संरक्षक भिंत कोसळून यात एका पादचाऱ्यांचा मृत्यू झाला असून यात 2 पादचारी जखमी झाले आहेतBody:चांदीवलीत घराची भिंत कोसळून एका पादचाऱ्याचा मृत्यू 2 जखमी

मुंबई चांदीवली मध्ये बेस्ट बसची वाट पाहत थांबलेल्या पादचाऱ्यावर संरक्षक भिंत कोसळून यात एका पादचाऱ्यांचा मृत्यू झाला असून यात 2 पादचारी जखमी झाले आहेत

.चांदीवली येथील म्हाडा कॉलनी 1 मध्ये बंद घराची एक संरक्षक भिंत कोसळून. यात स्थानिक रहिवाशी चंद्रकांत मोनाप्पा शेट्टी 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत.

घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले आसून. स्थानिकांनी तात्काळ कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखालुन 3 लोकांना बाहेर काढत जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यात मृतक चंद्रकांत यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
हे चारही पादचारी बेस्ट बसची वाट पाहत उभे त्यावेळी अचानक या भिंतीजवळ असलेले झाडाची फांदी जुन्या घराच्या भिंतीवर कोसळले यात 4 जण जखमी झाले यातील एक जण रामचंद्र हे गंभीर जखमी झाले होते त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

भिंत कोसळलेल्या घरातील लोक सध्या दुसऱ्या जागी वास्तव्यास असून हे बंद घर विकासकाने पाडले नसल्याने ही दुर्घटना घडली असून यास विकासकच जबाबदार आहे. असे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. दुर्घटना घडल्या नंतर विकासकाने बाजूच्या धोकादायक भिंती व झाड पडण्याचे कार्य सध्या हाती घेतली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.