ETV Bharat / state

जेव्हा कोरोनाबाधित रुग्ण गाण्यावर धरतात ठेका...! - लातूर कोविड केअर सेंटर न्यूज

कोरोनाबाधित रुग्णांचे मनोबल वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. याचाच विचार करत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या परवानगीने लातूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये झुंबा डान्स वर्गाचे आयोजन केले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून या अनोख्या उपक्रमाला सुरुवात झाली.

Zumba Dance
झुंबा डान्स
author img

By

Published : Jul 29, 2020, 3:15 PM IST

लातूर - कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाने राबवलेला उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कोरोनाबाधित रूग्ण किंवा ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत, अशा रुग्णांसाठी झुंबा डान्सचा वर्ग घेतला जात आहे. त्यामुळे आपण कोरोनाबाधित रूग्ण आहोत हे विसरून रुग्ण गाण्यावर तर ठेका धरत आहेत.

लातूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी झुंबा नृत्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे

कोरोनाबाधित रुग्णांचे मनोबल वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. याचाच विचार करत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या परवानगीने कोविड केअर सेंटरमध्ये झुंबा डान्स वर्गाचे आयोजन केले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून या अनोख्या उपक्रमाला सुरुवात झाली. त्यामुळे रुग्णांच्या मनात सकारात्मक उर्जा निर्माण होत असून आपल्याला कोरोना झाला या मानसिकतेमधून ते बाहेर पडत आहेत.

जिल्ह्यात सध्या 598 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लातूर शहरातील 12 क्रमांकाच्या कोविड सेंटरमध्ये हा नृत्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे. या कोविड सेंटरमध्ये तरुणांसह वयोवृद्ध देखील उपचार घेत आहेत. मात्र, या उपक्रमादरम्यान वयोवृद्ध नागरिकही बेधुंद होऊन डान्स करत होते. झुंबा डान्स बरोबरच आता योगासने, व्यायाम, कथाकथन, सत्संग यासारखे उपक्रमही राबवले जाणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.